Friday, November 15, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या तपोवनात प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीचे अनावरण

नाशिकच्या तपोवनात प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीचे अनावरण


`

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

नाशिक मधील श्रीराम प्रभूंचे शिल्प प्रत्येकाला धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास इस्कॉन संस्थेचे वैश्विक समिती सदस्य गौरांग प्रभुजी यांनी व्यक्त केला.

तपोवनाची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून रामसृष्टी उद्यानात भव्य आकर्षक असे राज्यातील सर्वात मोठे प्रभू श्रीराम यांच्या ७० फूट उंचीचे शिल्पाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी ( दि. ११) सायं लोकार्पण करण्यात आला .

परमपूज्य इस्कान मंदिराचे गौरांग प्रभू, ज्येष्ठ अर्थ तज्ञ विनायक गोविलकर, महंत रामकिशोर शास्त्री, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत सुधीरदास पुजारी, महंत बालकदास महाराज, स्वामी श्रवनगिरी महाराज, अरूण गिरि महाराज, महंत भक्ती चरणदास महाराज, प्रजापिता ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी, पूनम दिदी, गोविंद दास महाराज, प्रवीणदास महाराज, संतोषदास उदासीन महाराज आदी उपस्थित होते.

अर्थ तज्ञ डॉ विनायक गोविलकर म्हणाले की, श्रीराम शिल्प हे अतिशय सुंदर अशी कल्पना साकार झालेली दिसते. आ. राहुल ढिकले यांनीयांनी प्रभू श्रीराम शिल्प मनात कल्पना येत नाही ती प्रत्यक्षात साकारली आहे.प्रभू श्रीराम म्हणजे गुणाचे द्योतक आहे. आ. ढिकले हे धर्म रक्षणाचे काम पुढील काळात देखील करीत राहतील असा विश्वास व्यक्त केला.

श्री दिगंबर आखाडाचे महंत रामकिशोरदास महाराज म्हणाले की, पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. भाजपा हा एकच पक्ष हिंदुत्ववादी आहे. उपस्थित सर्व संताचे पूजन करण्यात आले. धनंजय पुजारी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांची भव्यआतिषबाजी करण्यात आली.कार्यक्रमास माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी ,अरुण पवार, रुची कुंभारकर, प्रियंका माने,दिनकर आढाव, उद्धव निमसे, सरिता सोनवणे, सुरेश खेताडे प्रा.शरद मोरे, सुनील केदार, शाम बडोदे, मुकेश शहाणे, प्रवीण भाटे , सौरभ सोनवणे, सोमनाथ बोडके, विशाल गोवर्धने , राहुल क्षीरसागर,नरेश पाटील यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

तपोवनात श्रीराम सृष्टी उद्यानात श्रीराम शिल्प लोकार्पण पंचवटीसाठी सुवर्ण क्षण आहे. कोरोना काळात अँटी श्रीराम होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सरकार येताच निधी मंजूर झाला. भारतातील रामसृष्टी उद्यान पर्यटक हब होणार आहे, ७०;फूट उची श्रीराम शिल्प, १०८ फूट उच भगवा झेंडा आहे. राजकीय भूमिका व धार्मिक भूमिका वेगळी असते. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ येथे ६०० खाटाचे वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या