Tuesday, March 25, 2025
Homeनगरराज्यात सर्वाधिक गोदामे अहिल्यानगर जिल्ह्यात

राज्यात सर्वाधिक गोदामे अहिल्यानगर जिल्ह्यात

नादुरुस्त गोदामांची संख्याही अधिक || बीपीएल कार्डधारकही जास्त

संगमनेर | संदीप वाकचौरे| Sangamner

राज्यामध्ये सर्वाधिक गोदामांची संख्या अहिल्यानगर जिल्ह्यात असून दुर्दैवाने सर्वाधिक नादुरुस्त गोदामांची संख्या देखील याच जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात 1 हजार 115 गोदामांची संख्या असून त्यातील 82 गोदामे एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. राज्यामध्ये शासनाच्यावतीने धान्य साठवण्यासाठी गोदामांची निर्मिती करण्यात येते आहे. महाराष्ट्रात एकूण 1 हजार 115 गोदामे अस्तित्वात आहेत. त्यांची एकूण साठवण क्षमता 8 लाख 34 हजार 760 मॅट्रिक टन आहे. एकूण गोदामांपैकी 310 गोदामे ही नादुरुस्त आहेत. त्यांची क्षमता 1 लाख 41 हजार 762 इतकी आहेत. या गोदामांपैकी 17 गोदामे इतरांना भाड्याने देण्यात आली आहे. त्यांची क्षमता सहा हजार चारशे मॅट्रिक टन इतकी आहे. राज्यामध्ये 44 गोदामे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यात आली आहे. त्यांची साठवण क्षमता 36 हजार 840 मॅट्रिक टन आहे. त्यादृष्टीने राज्यामध्ये एकूण 902 गोदामे उपलब्ध आहेत.

- Advertisement -

याचबरोबर 51 हजार 673 स्वस्त धान्य विक्री दुकाने सुरू आहेत. त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यात 1 हजार 888 इतकी रेशन दुकाने उपलब्ध आहेत. तर एकूण 82 गोदामे असून त्यांची क्षमता 62 हजार 210 मेट्रिक टन इतकी आहे. त्यापैकी 41 गोदामे नादुरुस्त असून त्यांची क्षमता 21 हजार 850 इतकी आहे. जिल्ह्यातील तीन गोदामे इतरांना भाड्याने देण्यात आलेली असून त्यांची क्षमता 1 हजार 300 मीटर इतकी आहे. जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणार्‍या एकूण गोदामांपैकी केवळ 38 गोदामे साठवणुकीसाठी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंबांना अन्नधान्याचे नियंत्रण व रास्त भाव दुकानदारांना 83 हजार 685 मेट्रिक टन तांदूळ व 51 हजार 758 मेट्रिक टन गहू वितरित करण्यात आला आहे.

अंत्योदय योजनेअंतर्गत 21 हजार 379 मेट्रिक टन तांदूळ व 13 हजार 560 मेट्रिक टन गहू वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यामध्ये एकूण 2 कोटी 65 लाख 20 हजार 404 इतके शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 10 लाख 54 हजार 70 इतके शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात शुभ्र शिधापत्रिका धारकसंख्या अवघी 47 हजार 417 इतकी आहेत, तर पिवळ्या रेशनकार्ड धारकांमध्ये बीपीएल रेशनकार्ड धारक संख्या 2 लाख 16 हजार 133, अंत्योदय शिधापत्रिका संख्या 87 हजार 141 इतकी आहे. प्राधान्य कुटुंब रेशनकार्ड संख्या 4 लाख 20 हजार 874 इतकी आहे. बिगर प्राधान्य कुटुंबांची संख्या 2 लाख 82 हजार 505 इतकी आहे.

राज्यात बीपीएल कार्डधारकांची संख्या अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यामध्ये 2 लाख 15 हजार 41 इतकी कार्डधारक संख्या आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बीपीएल कार्डधारक संख्या आहे. ती 15 हजार 260 इतकी आहे. पुणे, नांदेड व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही संख्या शून्य दर्शवण्यात आली आहे. शुभ्र कार्डधारकांची संख्या राज्यात मुंबईत सर्वाधिक असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नोंदविण्यात आली आहे. तिसर्‍या क्रमांकावर रायगड जिल्हा आहे.

राज्य लवकरच केरोसीन मुक्त
राज्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत घरगुती गॅस जोडणी असलेले शिधापत्रिकाधारक वगळून उर्वरित शिधापत्रिका धारकांना केरोसीन म्हणजे रॉकेलचा पुरवठा करण्यात येतो. राज्यामध्ये 31 जिल्हे हे केरोसीन मुक्त झाले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात राज्यातील सर्व जिल्हे केरोसीन मुक्त होतील असा अंदाज व्यक्त होत आहे. शासनाच्यावतीने प्रत्येक घरात गॅस उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात येत असल्यामुळे राज्याला हे यश लाभले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...