धुळे । प्रतिनिधी Dhule
शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी येथे आज रक्षाबंधनाच्या भल्या पहाटे १ वाजता घर कोसळून महीला ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला.
- Advertisement -
या घटनेने सवाई मुकटी, परीसरात हळहळ व्यक्त होती आहे. या आठवड्यात रोज सुरू असलेल्या पावसामुळे मातीच्या घरांना धोका होता. यातच सवाई मुकटीतील मातीचे घर कोसळल्याने आरसतोलबाई अमृत देसले (वय ५२) ही महीला जागीच ठार झाली. तर महिलेचे पती अमृत आनंदा देसले हे किरकोळ जखमी झाले.
तलाठी एन.एस.पाटील यांनी या घटनेचा पंचनामा केला. नायब तहसिलदार राजपुत, चिमठाणे गटाचे जि,प,सदस्य विरेंद्रसिंग गिरासे व सर्कल धनगर, ग्रामसेवक विश्वनाथ पाटील आदींनी मयत महिलेच्या कुटुंबाचे सात्वन केले.