Tuesday, April 29, 2025
Homeधुळेखुनातील संशयित आरोपीचे घर जाळले

खुनातील संशयित आरोपीचे घर जाळले

धुळे – Dhule :

शहरातील मोहाडी उपनगरातील तरूणाच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीचे जमावाने घर जाळल्याची घटना आज भर दुपारी घडली. घटनेमुळे कुटुंबिय भयमित झाले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

मोहाडी उपनगरातील राहुल काशिनाथ मिंड/मराठे (वय 38) या तरूणाची दि. 19 जुलै रोजी लळींग टोल नाक्याजवळील महाकाल हॉटेल परिसरात पुर्ववैमस्यातून भरदिवसा हत्या करण्यात आली. याप्रकरणी मोहाडी पोलिसात आकाश कोळी, चॅम्पियनसिंग किस्मतसिंग भादा याच्यासह 24 जणांविरूध्द गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान गुन्ह्यातील संशयीत चॅम्पियनसिंग भादा यांच्या घरावर आज दि. 27 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जमाव चालुन आला. त्यांनी थेट घरा पेटवून दिले. त्यात घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. त्यामुळे घटनेमुळे कुटुंबिय भयभित झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील आग विझविण्यास मदत केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलाची केली...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जेलरोड परिसरात (Jail Road Area) असलेल्या मंगलमूर्ती नगरमध्ये राहणाऱ्या सुमित भारत पुजारी याने आपला आठ वर्षाचा मुलगा (Son)...