Thursday, May 15, 2025
Homeनाशिकखाकीची माणुसकी शाबूत; अर्धांगवायूचा झटका अन् कुटुंबाने बेदखल केलेल्या महिलेसाठी पाेलिसांची धावपळ

खाकीची माणुसकी शाबूत; अर्धांगवायूचा झटका अन् कुटुंबाने बेदखल केलेल्या महिलेसाठी पाेलिसांची धावपळ

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

गंगापूर राेडवरील प्रसाद सर्कललगत गेल्या दाेन दिवसांपासून अर्धांगवायूच्या आजाराशी दाेन हात करत बेघर अवस्थेत जीवन कंठणाऱ्या भुसावळ येथील पन्नास वर्षीय महिलेस गंगापूर पाेलिसांनी आशेचा किरण दाखवून आधार दिला आहे.

दैनिक ‘देशदूत’ला (दि. २०) शुक्रवारी रात्री एका जागरुक तरुण नागरिकाने महिलेच्या वस्तुस्थितीची माहिती कळविली. यानंतर, दैनिक ‘देशदूत’ने गंगापूरचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना अवगत केले. त्यांनी तत्काळ माहिती जाणूण घेत स्टाफला घटनास्थळी रवाना केले. तेव्हा संबंधित महिला किलबिल शाळेच्या भिंतीजवळील रस्त्याच्या कडेला मागील दाेन दिवसांपासून वास्तव्य करत होती, असे समाेर आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

गंगापूर पाेलिसांच्या महिला अंमलदारांनी या महिलेची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा तिने भावूक हाेऊन आपबिती कथन केली. तसेच तिला अर्धांगवायूचा आजार जडल्याचे दिसून आले. दरम्यान, राजपूत यांच्या सूचनेने पीडित महिलेस साेबत घेऊन पथकाने आवश्यक ती कार्यवाही करुन आनंदवल्लीजवळील वात्सल्य वृद्धाश्रमात दाखल केले आहे. पाेलिसांनी दाखविलेल्या या औदार्याचे सर्वत्र काैतुक हाेत असून पुढील कारवाई सुरु केली आहे. एकीकडे मद्यधुंद तरुणाईचा कहर सर्वांनीच पाहिला असतानाच, एका जागरुक तरुणाने दाखविलेल्या या नि:शब्द माणूसकी भावाचा परिचय सर्वांसाठी कृतीदायक ठरेल, यात शंका नाही!

कुटुंबाने वाऱ्यावर साेडले
संबंधित महिलेने पाेलिसांशी बाेलतांना ‘माझे कोणीही नातेवाईक मला सांभाळण्यास तयार नाही. मला येथे सोडून गेले आहेत’ असे तिने सांगितले. त्यामुळे कर्तव्यावरील अंमलदारांचे डाेळे पाणावले. त्यांनी कुटुंबाप्रमाणेच महिलेस प्रेम देऊन मदतीसाठी तयार असल्याचे दाखवून दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...