धुळे । प्रतिनिधी dhule
तालुक्यातील कुंडाणे-वेल्हाणे येथे घरात लहान दोन मुले झोपलेली असतांना पती-पत्नीने एकत्र गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. याबाबत तालूका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र बाळू पाटील (30) व टिना जितेंद्र पाटील (25) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांना सहा वर्षीय मुलगी व तीन वर्षीय मुलगा आहे. घरगुती भांडणातून या दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. आत्महत्येपूर्वी जितेंद्र पाटील याने आपल्या लहान भावाला आत्महत्या करत असल्याचा मोबाईलवर मॅसेज केला. भावाने तात्काळ आपल्या मित्राला फोन करुन घरी जाण्याचे सांगितले. परंतु दोघे गळफास लावलेले आढळून आले. सदर घटनेची माहिती मिळताच पीआय दत्तात्रय शिंदे, पीएसआय विजया पवार, हे.कॉ. सुनील जावरे आदी घटनास्थळी आले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याबाबत तालूका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.