Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमपतीने पत्नीला मारहाण करत पाजले विष; उपचारादरम्यान मृत्यू

पतीने पत्नीला मारहाण करत पाजले विष; उपचारादरम्यान मृत्यू

पोलीसात गुन्हा दाखल

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

बाहेरच्या महिलेशी संबंध ठेवू नका, असे समजावून सांगितल्याचा राग (Anger) आल्याने पत्नीला लाकडी काठी व लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) करत विषारी औषध (Poisonous) पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. विषारी औषधामुळे अस्वस्थ झालेल्या पत्नीवर (Wife) नगरच्या जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी पती विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत जाई धनंजय लांडगे (रा. शेती व घरकाम, रा. चोराची वाडी) यांनी फिर्याद दिली आहे. यात संगिता बापू दातीर यांनी पती बापू झुंबर दातीर याला बाहेरच्या महिलांशी संबंध ठेवू नका, असे सांगितल्याचा बापू दातीर यांना राग आला. त्यामुळे त्यांनी पत्नी संगिता हिस लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करत विषारी औषध पाजले. यामुळे संगिता अस्वस्थ झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही प्रकार 11 तारखेला झाला होता. उपचारादरम्यान संगिता यांचा 12 तारेखाला मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी लांडगे यांच्या फिर्यादीवरून पती (Husband) बापू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सहायक पोलीस निरिक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...