Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या'या' दिवसापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

‘या’ दिवसापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज (दि.१८) सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली.गुरुवार (दि.२०) पासून उघडीप मिळणार असून राज्याच्या काही भागात चक्रीवादळाचे  फक्त संकेत आहेत.परतीचा पाऊस  वेगात माघारी सरकत आहे,असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईसह संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील खान्देश नाशिकपासुन ते सिंधुदुर्ग, कोल्हापूरपर्यंत १४ जिल्ह्यात बुधवारी(दि.१९)  जोरदार पावसाची शक्यता  कायम आहे.पावसाचा जोर रत्नागिरी, सातारा, सोलापूर ,सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर ह्या जिल्ह्यात अधिकच जाणवतो.

वरील क्षेत्रात त्यानंतर म्हणजेच २ दिवसानंतर गुरुवार दि.२० ऑक्टोबरपासुन पावसाचा जोर काहीसा कमी होऊन केवळ ढगाळ वातावरणासहित वापसा व शेतकामासाठी उघडीप मिळू शकते.  

परतीच्या पाऊस वेगाने माघारी सरकत असुन कदाचित गुरुवार दि.२० सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातून पूर्णपणे बाहेरही पडू शकतो.बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटाजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती असुन बेटाच्या पश्चिमेला दोन दिवसात (दि.२० ) हवेच्या कमी दाबाचे तर धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे(डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता असुन आंध्रप्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयला दूर पश्चिम-मध्य समुद्रात दिवाळीपाडवा- भाऊबीजेदरम्यान (दि.२६-२७) कदाचित चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते.

सध्यातरी राज्यात त्याचा काही परिणाम होणार नाही असे दिसत असले तरी ८-१० दिवसानंतर चित्र अधिकच स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याबाबत सध्या तरी कोणतीही धास्ती मनी बाळगू नये,असा सल्ला निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या