मुंबई | Mumbai
मोसमी पावसाच्या (Rain) परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची घोषणा हवामान विभागाने (IMD) नुकतीच केली होती. मात्र, मोसमी पावसाने अजून माघार घेतलेली नाही. उद्या (दि. २३) पासून राज्याच्या बहुतेक भागांत मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. त्याबाबतचा इशारा हवामान विभागाने आज दिला. नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.
हे देखील वाचा : “NDA मध्ये आल्यास केंद्रीय मंत्रिपद देतो”; प्रकाश आंबेडकरांना ‘या’ नेत्याची मोठी ऑफर
आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मोसमी पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होत आहे. अंदमानमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याच्या दिशेने सरकत आहे. परिणामी राज्याच्या बहुतेक भागांत पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाच्या अंदाजात म्हटले आहे.
हे देखील वाचा : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
हवामान विभागाचे पुण्यातील हवामानतज्ञ डॉ. डी. के. होसाळीकर यांनी ‘एक्स’ समाज माध्यमावर जोरदार पावसाची भविष्यवाणी केली आहे. पश्चिम मध्य बंगालची खाडी आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात येत्या ४-५ दिवसांत महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा, महाराष्ट्राचा घाट भाग आणि कोकणातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीक कापणीआधी हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेत हवामान विभागाने आज (दि.२३ सप्टेंबर) रोजी रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार, या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह कोल्हापूर, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा