नवी दिल्ली – New Delhi
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (बीएआरसी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम त्याच्या आधीच्या हंगामापेक्षा अधिक पाहिला जात आहे. बार्क इंडियाने एका टिवटद्वारे ही माहिती दिली. बार्क म्हणाले…
‘ज्यांना काही जुन्या काळाचे वातावरण पहाण्याची इच्छा होती, त्यांच्यासाठी आयपीएल एक वरदान ठरले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत आयपीएलची दर्शकसंख्या वाढली आहे, असे आकडेवारी सांगते.”
बार्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, सर्व 21 वाहिन्यांवरील पहिल्या 7 सामन्यांसाठी 7 अरब मिनिटे दर्शकांची वेळ नोंदवली गेली, जी आयपीएल-12 पेक्षा 28 टक्क्यांनी जास्त आहेत. आयपीएल-12 चे 44 सामने 24 चॅनेलवर 5.5 अरब मिनिटांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले होते.
एका यूझरने लिहिले, ‘कोणीही आयपीएल स्टेडियममध्ये पाहू शकत नाही. म्हणून प्रत्येकजण टीव्हीवर पाहणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आकडेवारी वाढणे सामान्य आहे. आपण लॉकडाउनचे आभार मानले पाहिजेत.‘कोरोनामुळे यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आयपीएल-13 चे आयोजन केले जात आहे. 19 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू झाली. 10 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.