नाशिक | वार्ताहर | Nashik
इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या (Indiranagar Police Station) हद्दीत दुपारच्या वेळेला पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेला एका दुचाकीवरून वरून आलेल्या व्यक्तीने आपण सीबीआयचे (CBI) अधिकारी आहोत असे सांगून तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याचे घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ‘डे केअर’ भागातील श्रद्धा विहार (Shraddha Vihar) भागात दुपारच्या सुमारास पायी जाणाऱ्या रेखा सुभाष पाटील (Rekha Subhash Patil) (62) ह्या महिलेला गाठून आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत काढून ठेवा. असे सांगून बोलण्यात गुंग केले व चलाखीने दागिने पळवून नेले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
या दागिन्यांची किंमत सुमारे एक लाख दहा हजार रुपये सांगण्यात आले आहे. सदर बाबीचा तपास सुरु असून, अधिक तपास इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. आर. बोराडे करीत आहेत.
राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ सुरु करणार