मुंबई | Mumbai
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’नंतर हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आलेला सिनेमा आहे.
या चित्रपटवरून रोज नवा वाद सुरू आहे. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.
पण या चित्रपटाला विशिष्ट गटाकडून कडकडून विरोध होत असून, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण काही जण हा चित्रपट आवर्जून पहा असेही सांगत आहेत. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाला विरोध होत असला तरी चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी झालेले नाही.
पुण्याच्या विमाननगरमध्ये आयटी कंपनीला आग; अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १२ कोटी रुपये कमावले होते. त्याबरोबरच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे १६.५० कोटी, तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने १०.५० कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या पाचव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.
शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका
मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने पाचव्या दिवशी ११ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पाच दिवसात चित्रपटाने ५६. ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाला होणार विरोध चित्रपटाच्या यशाचे कारण ठरलं आहे असे म्हटले जात आहे.
Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धि इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. चित्रपटातील सर्वच कलाकारांचे त्यांच्या दर्जेदार अभिनयामुळे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. सुदीप्तो सेनने या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.