Friday, September 20, 2024
Homeनाशिकपोलिसांच्या खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

पोलिसांच्या खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

- Advertisement -

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठींबा देण्यासाठी आज आदिवासी विकास भवना समोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी बुधवारी (दि. 28) येथील आदिवासी विकास भवनवर भव्य मोर्चा काढला.दुपारी मोर्चे कर्‍यांनी जोरदार घोषणा बाजी करुन परीसर दणानुन सोडला.

दरम्यान आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन आज एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला खांद्यावर उचलून घेतले .

पोलीस वाहनांपर्यंत पोहचणेसाठी बरेचसे अंतर कापले व त्या नंतर पोलीसांच्या वाहनात तातडीने नेऊन रुग्णालयात दाखल केले. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या योगिता फसाले, होमगार्ड पगारे यांनी त्यांना मदत केली. या वेळी पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन महिला कर्मचारी मनीषा सोनवणे व त्यांच्या सहकाऱयांनी घडविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या