Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षनेता पडद्याआडून माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न, पण मी घाबरत नाही :...

विरोधी पक्षनेता पडद्याआडून माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न, पण मी घाबरत नाही : दरेकर

मुंबई l Mumbai

मुंबई बँकेतल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे सहकार विभागाने आदेश दिले आहेत. चौकशीसाठी सहकार विभागातल्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. बँकेला झालेल्या ४८ कोटी रुपयांचा तोटा, बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेले कर्ज, बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची चौकशी, गृहनिर्माण संस्थांना स्वयंपूर्नविकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची चौकशी, बँकेचे मुख्यालय आणि शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च या सगळ्याची चौकशी होणार आहे.

- Advertisement -

भांडवलात घट होऊन ते ७.११ टक्के कसे झाले. मुंबई बॅंक तोटा प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टिका केली आहे.

यापूर्वीही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर संचालक मंडळाविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. खातेदारांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचाही आरोप करण्या आला होता. तर नाबार्डनेही मुंबई बँकेच्या कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता

मुंबई बॅंक तोटा प्रकरणी सहा मुद्द्यांची तपासणी लावली आहे हे खर असल्याचे सांगत दरेकर म्हणाले अनेक मुद्दे घेऊन मी विरोधी पक्षनेता म्ह्णून समोर येतो. प्रश्न मांडतोय म्हणून पडद्याआडून माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न आहे. पण मी घाबरत नाही असे दरेकर म्हणाले.

बँक एनपीएमध्ये गेली होती त्यामुळे तोटा होता मात्र आता सर्वांनी मेहनत घेऊन आता बँक नफ्यात आली. ज्यांच्या विश्वासावर बँक मोठी झाली त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे. खरं म्हणजे ही रुटीन तपासणी असल्याच ते म्हणाले. साखर कारखान्यांना दिलेले कर्ज कॉर्पोरेट लोन आहे. त्यामुळे बँकेचा फायदा झाला, CBS प्रणाली बँकेत आहे. त्यामुळे तपशीलवार माहिती दिली जाईल. तपासणी करा काही हरकत नसल्याचे ते म्हणाले.

सेल्फ डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी मिळणार आहे. सहाही मुद्द्यांमध्ये आरोप करण्यात काही तथ्य नाही. तपशीलवार माहिती दिली जाईल असे ते म्हणाले. संस्था उभी करणे आणि चालवणे अवघड असते. या बँकेतून आम्ही शेतकरी हौसिंग सेक्टर ला आधार देण्याचा प्रयत्न केल्याचे दरेकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या