Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'निसाका'त बिबट्या जेरबंद

‘निसाका’त बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे | प्रतिनिधी Kasbe sukene

निफाड तालुक्यातील बंद असलेल्या निफाड साखर कारखान्यात आज पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे.एकूण तीन ते चार बिबट्यां पैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

या परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे, दरम्यान वन विभाग व आधुनिक बचाव पथक, निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा बचाव पथक, एआरइए एस पथक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बिबट्यांची रेस्क्यू ऑपरेशन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या मागोवा घेत बंद असलेल्या कारखान्याच्या आतील भागात दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते .यात भक्ष्य म्हणून शेळ्या ठेवण्यात आल्या होत्या, बिबट्याचा मागोवा त्याचा संचार या सर्व गोष्टींचा आढावा घेत बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.

YouTube video player

उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने, वनपरिक्षेत्राधिकारी राहुल घुगे, वन परिमंडळ अधिकारी जयराम शिरसाट तसेच आधुनिक बचाव पथक वनरक्षक विजय दोंदे , निर्भय संचार फाउंडेशन संचालित वनराजा शरद जाधव व पथक, एआरईएएस सुशांत व यांनी एकत्रितपणे गेल्या सात दिवसांपासून या ठिकाणी सदर बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी विविध उपाय योजना सुरू केल्या या प्रयत्नाला यश आले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ जानेवारी २०२६ – प्रजेची मूलभूत जबाबदारी

0
आज आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिवस. दरवर्षी हा दिवस समाज उत्साहात साजरा करतो. करायलाही पाहिजे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असा देशाचा जगात लौकिक...