Tuesday, March 25, 2025
Homeनाशिक…अन वाचले रेल्वे प्रवाशाचे प्राण

…अन वाचले रेल्वे प्रवाशाचे प्राण

मनमाड । प्रतिनिधी Manmad

भरधाव तपोवन एक्स्प्रेसमधून खाली पडून प्रवासी जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चालकाने धावत्या ट्रेनला ब्रेक लावत प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी चक्क एक ते दीड कि.मी.पेक्षा जास्त अंतर एक्स्प्रेस मागे घेतली. चालक व गार्डने दाखवलेल्या समयसुचकतेमुळे गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला मनमाड येथे रुग्णालयात वेळेवर उपचार मिळून त्याचे प्राण वाचले. हा थरार अंकाई-मनमाड रेल्वे स्टेशनदरम्यान घडला.

- Advertisement -

नांदेड येथून मुंबईकडे जाणार्‍या तपोवन एक्स्प्रेसने अंकाई स्टेशन सोडल्यानंतर दरवाजात उभा असलेला एक प्रवासी खाली पडल्याने गंभीररीत्या जखमी झाला. हा प्रकार लक्षात येताच याची माहिती तपोवनच्या गार्डने वाकीटॉकीवरून इंजिन ड्रायव्हरला दिली. माहिती मिळाल्यानंतर चालकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली, मात्र गाडी वेगात होती त्यामुळे ती एक ते दीड कि.मी. लांब जाऊन थांबली. अखेर चालकाने ज्या ठिकाणी प्रवासी पडला होता तिथपर्यंत गाडी मागे घेऊन गेल्यानंतर इतर प्रवाशांनी गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला गाडीत आणले.

त्यानंतर तपोवन एक्स्प्रेस मनमाडला येताच जखमी प्रवाशाला आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे त्याचा जीव वाचला. तपोवन एक्स्प्रेसच्या चालकाने ट्रेन मागे नेली नसती तर कदाचित या प्रवशाचा मृत्यू झाला असता.
मात्र गार्ड आणि ड्रायव्हर यांनी माणुसकीसोबत समयसुचकता दाखवल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला जीवदान मिळाल्याने त्यांचे प्रवाशांनी कौतुक केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...