धुळे dhule। प्रतिनिधी
धुळे शहर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (Dhule City Nationalist District President) रणजीत भोसले यांनी व त्यांच्या सहकार्यांनी महानगर पालिकेचे (Municipal Corporation) कचरा ठेकेदार (Garbage contractor) श्री.फडतरे यांच्या तोंडाला काळे फासून मारहाण (beating) केल्या बददल सुरू असलेल्या कथील आंदोलनाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही. सफाई कामगारांनी पक्षाचे नेते व पक्षाला दुषने देवू नये, असे पत्रक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ.अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
आंदोलनाबाबतचा कार्यक्रम कधी ठरला? निर्णय कुठे झाला? कुणाच्या कल्पनेतून आंदोलन होते? आंदोलनाचे स्वरूप काय होते? या बददल पक्ष म्हणुन मला स्वत:ला व पक्षाच्या नेत्यांना काडी इतकी कल्पना नव्हती, असे सांगत श्री.गोटे यांनी पत्रकांत म्हटले आहे की, अन्य कुढल्याही राजकीय पक्षापेक्षा किमान 10 पट मोठे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय शहरात आहे.
या कार्यालयात सगळ्यांनी नियमित पणे उपस्थिती राखावी, असे आदेश शरद पवार यांनी जाहीर पणे केले होते. त्याचे पालन न करता परस्पर बैठका घ्यायच्या आणि परस्पर निर्णय घ्यायचे ही बेशिस्तीची सवय म्हणजेच पक्षाचे काम, असा समज काही तथाकथीत नेत्यांनी करून घेतला आहे.
कचरा ठेकेदार काम व्यवस्थित करीत नाही, चुका करतो, पालीकेला फसवतो, याची सर्व जबाबदारी पालीकेचे पदाधिकारी व अधिकार्यांची आहे. पालीका प्रशासन ही दिर्घकाळ चालणारी यंत्रणा आहे. त्यामुळे ठेकेदारा विरूध्दचे आंदोलन हे समर्थनीय ठरू शकत नाही, असेही गोटेंनी नमूद केले आहे.
होय, हे आंदोलन राष्ट्रवादीचेच! नवख्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये
कचरा ठेकेदाराच्या विरोधात केलेले आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत आंदोलन होते. या आंदोलनाशी व्यक्तीगत माजी आ.अनिल गोटे व त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचा संबंध नाही. कारण राष्ट्रवादी पक्ष हा धर्मनिरपेक्ष तत्वावर आणि सगळ्यांना सोबत घेवून चालणारा पक्ष आहे. पक्षात नवीन आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, अशी प्रतिक्रिया पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी पत्रकान्वये व्यक्त केली आहे.
श्री.भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोणते आंदोलन कुठे? कसे? करायचे हे निर्णय, कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष घेतात. आतापर्यंत धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास 187 कार्यक्रम, आंदोलन, निवेदन, मोर्चा, बैठका, चर्चासत्र झाले. यापैकी अनेक ठिकाणी श्री.अनिल गोटे व लोकसंग्राम सहभागी झाले नाहीत.
गोटे यांना आमदारकीत स्वारस्य आहे. त्यामुळे त्यांनी तिथे लक्ष घालावे. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अर्जूनराव टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामकाज चालू आहे. वेळोवळी त्यांना तसा अहवाल दिला जातो. राहिला प्रश्न सफाई कामगार यांच्या रोषाला सामोरे जाण्याचा तर, राजकीय जीवनात वावरत असतांना घरावर हल्ले होणे, गुन्हे दाखल होणे, मारामार्या, शिव्या खाणे हे जनतेसाठी करावेच लागते. याला घाबरण्याचे कारण नाही हे आम्ही आपणांकडूनच शिकलो असा उपहासात्मक चिमटाही भोसले यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी पक्ष म्हणजे लोकसंग्राम नाही
राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. मात्र शोकांतिका आहे की, श्री.अनिल गोटे हे पक्षात नवे आहेत. त्यांना अजूनही राष्ट्रवादी पक्ष कळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे, काम करण्याची पध्दत ही त्यांना माहित नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि श्री.गोटे हे आतापर्यंत फक्त त्यांच्या एका छोट्या खाजगी पक्षात काम करीत होते.
पक्षाला तेच अध्यक्ष, तेच प्रवक्ता, तेच कार्यकर्ता आणि तेच खजिनदार होते. त्यामुळे तिथे त्यांची एकतर्फी हुकूमत होती. या व्यापक पक्षात नवीन आलेल्यांनी पक्षनिष्ठा, नियम, धोरणे हे जुन्या जाणत्या, निष्ठावंत लोकांना शिकविण्याचा प्रयत्न करु नये, असेही पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.