Saturday, May 18, 2024
Homeनगरपैसे दुप्पटचे अमिष, साडेचार लाखांना लुबाडले

पैसे दुप्पटचे अमिष, साडेचार लाखांना लुबाडले

श्रीगोंदा|प्रतिनिधी| Shrigonda

पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष (The lure of doubling the money) दाखवून एका व्यवसायिकाला (Businessman) दोघांनी साडेचार लाखांना गंडा घातला. तालुक्यातील हिरडगाव फाटा (Hiradgav Phata) येथील साईकृपा कारखान्याजवळ (Saikrupa Factory) ही घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) करमाळ्याचे व्यवसायिक दत्तात्रय शेटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

शेटे यांच्यावर करमाळा (Karmala) येथील एका बँकेचे कर्ज (Bank Loan) होते. ते फेडण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. ओळखीतून एका जणाने श्रीगोंद्यात (Shrigonda) पैसे दुप्पट (Double the money) करून देणारे लोक असल्याचे त्यांना सांगितले. शेटे यांची आरोपींसोबत ओळख व बैठका घडवून आणण्यात आल्या. पैसे दुप्पट करण्याच्या मोहात अडकवून आरोपींनी शेटे यांना हिरडगाव फाट्यावर (Hiradgav Phata) बोलाविले. त्यांच्याकडून साडेचार लाख रूपये रोख रक्कम घेण्यात आली व हातात तांदूळ, लिंबू, फुले ठेवुन सदरची रक्कम ही भगव्या कपड्यामध्ये पॅक करून कारच्या डिक्कीमध्ये ठेवली.

शेटे यांना मोटारीला प्रदक्षिणा घालण्यास सांगून डिक्कीमधील रोख रक्कम काढुन घेवुन फिर्यादीची विश्वास घात करुन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गट (Sub Inspector of Police Ranjit Gat) करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या