Sunday, May 5, 2024
Homeनाशिकमॅनेजरने बहिणीच्या साथीने केला 'इतक्या' काेटींचा अपहार; फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा

मॅनेजरने बहिणीच्या साथीने केला ‘इतक्या’ काेटींचा अपहार; फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा

नाशिक। प्रतिनिधी

शेतीसाठी लागणारे खत उत्पादन करणाऱ्या एका कंपनीत मॅनेजर असलेल्या संशयिताने बहिणीच्या मदतीने खताची परस्पर विक्री करुन कंपनीस एक काेटी सहा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानुसार गंगापूर पाेलिस ठाण्यात बहिणभावावर फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

विवेक सुरेश मुंजवाडकर आणि अश्विनी बीडकर अशी संशयित बहिणभावाची नावे आहेत. ‘न्यूकेम सनरेशिया’ या खत विक्री, उत्पादन करणाऱ्या कंपनीचे गंगापूर राेडवरील पाईपलाईन राेडजवळ काॅर्पाेरेट कार्यालय आहे. कंपनीत मुंजवाडकर हा मँनेजर हाेता, तर त्याची बहिण मदतनीस हाेती.

सन २०१० ते २०२३ पर्यंत दाेघे काम करत असताना त्यांनी या कालावधीत कंपनीत आलेले लाखाे रुपयांचे शेतीविषयक फर्टिलायझर, लिक्विड, स्टिम्युलंट व इतर उत्पादने ताब्यात घेऊन त्यांची नाेंद केली. वास्तविक हे खत किंवा उत्पादने ग्राहकांना व खत दुकानांना विक्री न करता परस्पर तिऱ्हाईत ठिकाणी विक्री केली. त्यातून मिळालेले पैसे स्वत:कडे ठेवून बनावट पद्धतीने कागदाेपत्री व्यवहार दाखवित माल विकल्याच्या नाेंदी केल्या.

वास्तविक कंपनीत आलेला माल शेतकऱ्यांना व फर्टिलायझर कंपन्यांना विकण्याचे ठरलेले असताना दाेघांनी संगनमत करुन या मालाचे बनावट कागदपत्रे व बिल बनवून तिऱ्हाईत ठिकाणी विक्री करुन पैसे मिळवित पैशांचा भरणा कंपनीत केला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालक दीया वर्मा(रा. सम्राट क्युबिझम, गंगापूर रोड, आनंदवल्ली नाशिक)यांनी फिर्याद दिली आहे. महिला उपनिरीक्षक एन. पी. साेळंके तपास करत आहेत. संशयितांकडे चाैकशी करुन त्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पाेलिसांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या