Thursday, March 27, 2025
Homeशब्दगंधमन हा मोगरा

मन हा मोगरा

मन हा मोगरा

अर्पुनी ईश्वरा।

- Advertisement -

पुनरपि संसारा येणे नाही।1।

मन हे शेवंती अर्पुनी भगवंती।

पुनरपि संसृती येणे नाहीँ।2।

मन हे तुळसी अर्पुनी हृषीकेशी।

पुनरपि जन्मासी येणे नाही।3।

तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा।

तया वास व्हावा वैकुंठासी।4।

गंध गेला हा सांगुनी

गंध गेला हा सांगुनी, आला मोहक मोगरा

बघ कसा रे मनात, दरवळतो मोगरा

रानीवनी पानोपानी, खुलुनी दिसे साजरा

हिरव्या रानी मुग्ध कळी, बहरतो हा मोगरा

शुभ्रफुलांचा ताटवा, करी किती रे नखरा

नवथर यौवनास, खुलुनी दिसे साजरा

कामिनिंच्या नजरेत, भाव उमटे लाजरा

मोकल्या कृष्णकुंतली, रिमझिमतो मोगरा

अबोल झाले अधर, गंधित झाल्या नजरा

प्रितीचे गोड गुपित, जणु सांगतो मोगरा

मंद मंद सुगंधाने,भरून गेला गाभारा

श्वासातुनी अजुनही, घमघमतो मोगरा !

आंतरजालावरुन साभार

मोगरा फुलला

मोगरा फुलला

सुगंध दरवळला

हिरव्या हिरव्या वेलीला

मोगरा फुलला

पहाटे पहाटे सुगंध दरवळला

आनंंदी आनंद झाला

अंगणी मोगरा फुलला

हर्ष मनी झाला

मोगरा सांगे मजला

देणं लेणं आपला

जगी सुगंध देण्याला

जन्म सार्थक आपला

माझ्या जीवनी मोगरा फुलला

देण लेणं लेवला

मनी आनंदी आनंद फुलला

दुःख सारं विसरला

असा मोगरा फुलला

मन मोर नाचला

वेणी कल्पीत गजरा माळला

जीवन आनंद राज्य केला

माळण्यापरी तो वेलीवर शोभला

असा मोगरा जीवनी फुलला.

आंतरजालावरुन साभार

गंध गेला हा सांगुनी

गंध गेला हा सांगुनी, आला मोहक मोगरा

बघ कसा रे मनात, दरवळतो मोगरा

रानीवनी पानोपानी, खुलुनी दिसे साजरा

हिरव्या रानी मुग्ध कळी, बहरतो हा मोगरा

शुभ्रफुलांचा ताटवा, करी किती रे नखरा

नवथर यौवनास, खुलुनी दिसे साजरा

कामिनिंच्या नजरेत, भाव उमटे लाजरा

मोकल्या कृष्णकुंतली, रिमझिमतो मोगरा

अबोल झाले अधर, गंधित झाल्या नजरा

प्रितीचे गोड गुपित, जणु सांगतो मोगरा

मंद मंद सुगंधाने,भरून गेला गाभारा

श्वासातुनी अजुनही, घमघमतो मोगरा !

आंतरजालावरुन साभार

मोगरा फुलला, मोगरा फुलला

फुलें वेचिता बहरु कळियांसीआला

इवलेसे रोप लावियेले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी

मनाचिये गुंती गुंफियला शेला

बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला

का मोगरा फुलेना

बरसात चांदण्याची, वारा कसा हलेना

का मोगरा फुलेना ?

डोळ्यांतल्या जळाने मी रूप थोर केले

वाढीस लागला हा आले वसंत, गेले

हिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना ?

का मोगरा फुलेना ?

माझ्या मनोव्यथांची हळुवार भावगीते

भवती फिरून याच्या मी नित्य गात होते

हिमशुभ्र हास्य तैसे याच्यावरी डुलेना

का मोगरा फुलेना ?

लागे ना थांग याचा अजुनी न मौन सोडी

आधिच धुंद झाले मी मात्र गंधवेडी

चुकते कुठे कुणाचे माझे मला केळेना

का मोगरा फुलेना ?

गीतकार: ग. दि. माडगूळकर,

संगीतकार : राम कदम,

गायिका : सुमन कल्याणपूर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाटाच्या पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
वणी | वार्ताहर Vani पाटाच्या पाण्यात पडून एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दीड वाजेच्या...