नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
नागरी उड्डाण मंत्रालयाने नवी ड्रोन नियमावली २०२१ जाहीर केली आहे. ही यापूर्वीच्या मानवरहित विमान प्रणालीच्या (Unmanned Aircraft Systems) नियमावलीची जागा घेईल असे सांगण्यात आले आहे…
भारत सरकारने काही दिवसांपूर्वी एक ड्रोन नियमावली जाहीर केली होती. संबंधित क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून याविषयी प्रतिक्रिया, सूचना मागविण्यात आल्या होत्या.
नव्या नियमावलीतील बदल
-
नव्या नियमानुसार युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Identification Number) शिवाय ड्रोन उडवण्याची परवानगी नाही.
-
हा नंबर मिळवण्यासाठी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागणार आहे. हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असेल जिथे सर्व गोष्टी एकाच जागी उपलब्ध असतील.
-
मायक्रो ड्रोन्स, नॅनो ड्रोन्स आणि संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या वापरावेळी पायलटच्या परवानगीची गरज नाही.
-
ड्रोनच्या वापरण्यासाठी लागणाऱ्या २५ फॉर्म्स व परवानगीची संख्या आता ५ वर आणण्यात आली आहे.
-
ग्रीन झोनमध्ये ४०० फुटांपर्यंत आणि विमानतळाच्या परिघापासून ८ ते १२ किमी अंतरावर २०० फुटांपर्यंत उड्डाणासाठी परवानगी लागणार नाही.
-
योग्यता प्रमाणपत्र, देखभाल प्रमाणपत्र, आयात मंजुरी, विद्यमान ड्रोनची स्वीकृती, ऑपरेटर परवानगी, आर अँड डी संस्थेची अधिकृतता आणि विद्यार्थी रिमोट पायलट परवाना यांसारख्या गोष्टींची बरीच बंधने आता कमी करण्यात आली आहे.