Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्हा दूध संघ निवडणुकीवरील स्थगिती उठविली

जिल्हा दूध संघ निवडणुकीवरील स्थगिती उठविली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्य शासनाने (State Govt) मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Elections) कारण सांगून राज्यातील 7 हजार 147 सहकारी संस्थाच्या निवडणुकांना (Co-operative Societies)स्थगिती दिली (Postponement of elections) होती. मात्र, बुधवारी राज्य शासनाने उर्वरीत 7 हजार 146 सहकारी संस्था वगळता केवळ जिल्हा दूध संघाच्या (Election of District Milk Union) निवडणुकीची स्थगिती (Suspension lifted) उठवली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई (District Election Officer Santosh Bidwai) यांनी दिली. दरम्यान मावळत्या संचालक मंडळाची बैठक उद्या दि. 3 रोजी दुपारी 1 वा. आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द भाजप-शिवसेना शिंदे गट अशी सरळ लढत होणार आहे. दोन्हींकडून उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. प्रचाराला सुरूवात होताच राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण सांगत या निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी निवडणूकीवरील स्थगिती उठविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याने जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरील स्थगिती सहकार विभागाकडून उठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघासाठी आता दि. 10 रोजीच ठरल्याप्रमाणे मतदान प्रक्रिया होणार आहे.

अन्… आयुक्त डॉ.विद्या गायकवाड आल्या पावली परत गेल्याबँकेसाठी आई काँग्रेस तर दूध संघासाठी मुलगा शिंदे गटात

प्रचाराला पुन्हा सुरूवात

स्थगिती आदेशामुळे निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करीत आपला प्रचार थांबविला होता. मात्र आज स्थगिती उठताच पुन्हा प्रचाराचे नियोजन करण्याला सुरूवात झाली. मतदारांना फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटून संपर्क केला जात आहे.

Photos : राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘मुसक्या’ सुखाचा शोध घेणारे भावस्पर्शी संघर्षनाट्य!

तालुकानिहाय असे आहेत मतदार

जळगाव – 22, धरणगाव – 15, एरंडोल – 21, पारोळा – 31, अमळनेर – 36, चोपडा- 42, यावल – 22, भुसावळ – 11, मुक्ताईनगर – 19, बोदवड – 14, जामनेर – 35, रावेर – 38, पाचोरा – 48, भडगाव – 28, चाळीसगाव – 59 असे मतदार आहेत.

रासायनिक खतांच्या वापरात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

- Advertisment -

ताज्या बातम्या