Saturday, May 4, 2024
Homeजळगावबहु प्रतिक्षित हुतात्मा एक्सप्रेस ११ जुलैपासून नियमित धावणार

बहु प्रतिक्षित हुतात्मा एक्सप्रेस ११ जुलैपासून नियमित धावणार

भुसावळ Bhusaval (प्रतिनिधी) –

प्रवाशांच्या सेवेसाठी बंद झालेली भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस (Bhusawal Pune Hutatma Express) एलएचबी कोचसह दि. ११ जुलै पासून सुरु होत (Starting) आहे.

- Advertisement -

गाडी क्र.११०२५ अप, भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस दि.११ जुलै २०२२ पासुन भुसावळहुन रात्री १२.३५ वाजता सुटेल व पुणे येथे दुपारी १२.०५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्र.११०२६ डाऊन, पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस दि.१० जुलै २०२२ पासुन पुणेहुन सकाळी ११.४०वाजता सुटेल व भुसावळ येथे रात्री १०.०० वाजता पोहोचेल.

प्रवासा दरम्यान ही गाडी जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, ईगतपुरी (टेक्निकल हॉल्ट), कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, चिंचवड आदी स्थानकांवर थांबेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या