Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे झाले नामकरण यापुढे 'या' नावाने ओळखले जाणार...

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे झाले नामकरण यापुढे ‘या’ नावाने ओळखले जाणार…

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून भारतातील अनेक ऐतिहासिक वास्तू (Historical buildings) वा संस्थांची नावे बदलण्यात आली आहेत.

राज पथाचे (Raj Path) कर्तव्य पथ, औरंगजेब रोडचे अब्दुल कलाम रोड (Abdul Kalam Road), नियोजन आयोगाचे नीती आयोग, रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग आणि फिरोजशाह कोटला स्टेडियमचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण झालेले आपण बघितले आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) काळात आणखी एका ऐतिहासिक स्थळाचे (Historical sites) नाव बदलण्यात आले आहे. ते म्हणजे राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) महत्वाचे आकर्षण असलेले ‘मुघल उद्यानाचे’ (Mughal Garden) नाव बदलण्यात येणार असून आता त्याचे ‘अमृत उद्यान’ असे नामकरण करण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनात असलेले मुघल उद्यान आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाईल, अमृत उद्यानाला ऐतिहासिक ओखल आहे. हे उद्यान तयार करण्यासाठी, एडविन लुटियन्सने जगातील अनेक उद्यानांचा अभ्यास केला होता. या बागेत रोपे लावण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला होता.

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असताना या उद्यानाचे नाव ‘अमृत उद्यान’ म्हणून ठेवण्यात आले आहे. हे उद्यान दरवर्षी सर्वसामान्यांसाठी खुले होते. यंदाही ते ३१ जानेवारीपासून खुले होणार आहे. याठिकाणी भेट देणाऱ्यांसाठी दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या