Thursday, May 23, 2024
Homeनाशिकमनपाची करवसूलीसाठी धडक मोहीम; ४७० कोटीच्या वसूलीसाठी अडीच लाख स्मरणपत्र

मनपाची करवसूलीसाठी धडक मोहीम; ४७० कोटीच्या वसूलीसाठी अडीच लाख स्मरणपत्र

नाशिक | प्रतिनिधी

महापालिका करसंकलन विभागाने चालू आर्थिक वर्षासह जुन्या थकबाकी वसूलीसाठी अडीच लाख थकबाकीदारांना स्मरण पत्रे पाठवले आहे. दरम्यान या नोटीसीला प्रतिसाद न दिल्यास मोठ्या थकबाकीदारांना वटणीवर आणण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यापर्यंत कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

मनपाच्या वसूली विभागाने अडीच लाख थकबाकीदारांना स्मरण पत्रे पाठवले आहे. त्यामाध्यमातून ४७० कोटींचा मालमत्ता कर वसुलीसाठी स्मरणपत्रे धाडताच थकबाकीदार वठणीवर येऊ लागल्याचे चित्र निर्मीण झाले आहे. मागील आठवड्यात १५ कोटी ४७ लाखांची थकबाकी वसूल झाली आहे.

प्रत्यक्षात महापालिकेच्या उत्पन्नात करसंकलन विभागाचा मोठा वाटा आहे. गतवेळी शेवटच्या टप्प्यात विक्रमी कामगिरी करत करसंकलन विभागाने १८८ कोटींचा मालमत्ता कर वसुल करुन नवा किर्तीमान केला होता.

पंधराव्या वित्त आयोगाने विविध योजनाच्या लाभांसाठी निधी मोठ्या प्रमाणात लागणार असेल तर उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा अशा स्पष्ट सूचना शासनाने मनपाला दिल्या आहेत. त्यानुसार तत्कालीन आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी करसंकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात २०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले. त्यानुसार विशेष मोहीमेतून कर विभागाने चालू आर्थिक वर्षात १३२ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात यश मिळवले आहे. पण मागील काही वर्षांची थकबाकी ४७० कोटीच्या घरात पोहचली आहे. ती वसूल करणे डोकेदुखी ठरत असुन, त्याकडे करसंकलन विभागाने मोर्चा वळवला आहे.

या थकबाकीच्या वसूलीसाठी अडीच लाख थकबाकीदारांना स्मरणपत्रे पाठवण्यात आले आहे. स्मरणपत्राची कारवाई यशस्वी ठरत असून, या मोहीमेच्या पहिल्याच आठवड्यात थकबाकीदारांनी पंधरा कोटींचा भरणा केला आहे. नाशिकरोड विभागात सर्वाधिक ५ कोटींची वसुली झाली आहे. दरम्यान गतवेळेस पावणेदोन लाख थकबाकीदारांना स्मरणपत्रे पाठवल्यानंतर ५५ कोटींची वसुली झाली होती.

विभाग थकबाकी वसुली

सातपूर – ८३ लाख ६७ हजार

ना.पश्चिम – २ कोटी ६२ लाख

ना.पूर्व – २ कोटी ३८ लाख

पंचवटी – २ कोटी २१ लाख

नविन नाशिक – २ कोटी २८ लाख

ना.रोड – ५ कोटी १३ लाख

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या