Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याचार तासातच पंचवटीतील खुनाचा उलगडा

चार तासातच पंचवटीतील खुनाचा उलगडा

नाशिक । पंचवटी प्रतिनिधी

नाशकातील पंचवटीतील मालेगाव स्टँन्डजवळील हाेळकर पुल येथून गंगेवरील चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एका ४० ते ४३ वयाेगटातील फिरस्त्या व्यक्तिचा मृतदेह रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या अवस्थेत पादचाऱ्यांना रविवारी(दि. १०) सकाळी आढळून आला हाेता.

- Advertisement -

सदर हत्येचा उलगडा करण्यात पंचवटी पाेलिसांना चार तासांत यश आले आहे. याप्रकरणी सचिन रमेश वनकर(वय १९,रा. रामकुंड, पंचवटी) व त्याचा अल्पवयीन साथीदार या दाेघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक साडेसतरा वर्षांचा अल्पवयीन सराईत आहे. दाेघांवर चाेरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, मृत फिरस्ता व्यक्तिची ओळख अद्याप पटलेली नाही.

Nashik Crime News : पंचवटीत दोन ते तीन जणांकडून अज्ञात व्यक्तीचा खून

घटनेनंतर पाेलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकच्या अतिरिक्त पाेलीस उपायुक्त माेनिका राऊत, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पाेलीस निरीक्षक नंदन बगाडे, सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर आदी दाखल हाेत त्यांनी तपास पथकास गुन्हा उघड करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक रायकर, उपनिरीक्षक कैलास जाधव, योगेश माळी, गुन्हेशोध पथकाचे सहायक उपनिरीक्षक अशोक काकड, हवालदार उत्तम पवार, दत्तात्रय शेळके आदींनी पेठरोडवरील अश्वमेघ नगरमधून काही तासांत दाेघांना ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या