Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचे निलंबन

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचे निलंबन

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्याबाबत सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदान्वये चिटकविला आहे. सभेच्या इतिवृत्तामध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळाने सचिव घोलप यांना निलंबित केले असल्याची माहिती सभापती कल्पना चुंभळे व संचालकानी दिली.नाशिक बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी (ता. ०३) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती विनायक माळेकर, शिवाजी चुंभळे , तानाजी करंजकर, शिवाजी चुंभळे, प्रल्हाद काकड, सविता तुंगार , चंद्रकांत निकम, आदी उपस्थित होते

- Advertisement -

घोलप यांनी कार्यालयीन जावक .क्र. ९० दि. ०२ मे २०२४ या जुन्या तारखेस जावक रजिस्टरला नोंदवून सदर प्रस्ताव पणन संचालक, महाराष्ट्र यांना प्रत्यक्षात दि. १० मार्च २०२५ रोजी प्राप्त झाल्याचे त्यांचेकडील पत्राहून समजले. पत्रावर जा.क्र. पणन-५/नाशिक कृउबास विभाजन/२०२५/१०७६ दिनांक २५ मार्च २०२५ अन्वये आढळून आले आहे. अशा प्रकारे महत्वाच्या व कायम दस्तऐवजीमध्ये फेरफार करुन गंभीर गैरकृत्य घोलप यांनी केले. बाजार समितीच्या कामकाजाच्या कागदपत्रांमध्ये अजुनही अशा प्रकारचे गैरप्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नाही असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वतंत्र आरोपपत्र देवून खातेनिहाय चौकशी करण्याचे बाजार समितीने ठरविले आहे. परंतु चौकशी होई पर्यंत घोलप यांना सचिव पदावरुन निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान सचिव पदाचा पदभार, सर्व कागदपत्रे, किल्ल्या वगैरे सर्व वस्तु या सहा. सचिव निवृत्ती लहानु बागुल यांचेकडे सुपुर्द करण्यात आल्या आहेत.

तत्कालीन सभापतिनी केलेला कारभार स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. अशाप्रकारचे आणखी गंभीर प्रकार समितीत असू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालणार नसून, दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
कल्पना चुंभळे, सभापती, नाशिक बाजार समिती

तत्कालीन सभापतींच्या आदेशानुसारच इतिवृत्तात फेरफार झाला आहे. हा गैरप्रकार आहे. दोन दिवसांपूर्वीच एक जरी पुरावा दिला. तर राजकारणातून संन्यास घेईल असे तत्कालीन सभापती पिंगळे यांनी जाहीर केले होते. फेरफार प्रकारानंतर आता ते केव्हा संन्यास घेतील हे जाहीर करावे, याबाबत जनतेला उत्सुकता आहे.
विनायक माळेकर, उपसभापती , नाशिक बाजार समिती

नाशिक, त्रंबक, पेठ तालुक्यात बाजार समितीचे विभाजन हा विषय अजेंड्यावरील नसून, तो ऐन वेळचा विषय होता. तत्कालीन सभापतींनी संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करून त्याविषयी प्रोसिडिंग करायला सांगितली. त्यानुसार आपण नोंद घेतली आहे. याबाबत कोणतेही प्रकारची अफरातफर झाली नाही. या ठरावाबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. विद्यमान संचालक मंडळ सदरचा ठराव हा रद्दबातल देखील करू शकतो. आपल्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने झाली असून पूर्णपणे चुकीची आहे. या विरोधात न्यायालयात जाणार आहे.
प्रकाश घोलप, सचिव, बाजार समिती

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...