Saturday, May 4, 2024
Homeराजकीयस्वतंत्र लढण्याचा विचार नाही - जयंत पाटील

स्वतंत्र लढण्याचा विचार नाही – जयंत पाटील

मुंबई –

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि भाजपला

- Advertisement -

पराभूत करणं हेच आमचं ध्येयं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे असेही ते म्हणाले.

जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याची घोषणा केली आहे. या दौर्‍यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या दौर्‍याला महत्व प्राप्त झालं आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणखी एक पाऊल पुढे जात असून 17 दिवसांच्या या दौर्‍यात विदर्भ व खान्देशातील 14 जिल्हे, 82 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या 135 बैठका व 10 जाहीर सभा होणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. गडचिरोतील अहेरीपासून ही परीवार संवाद यात्रा काढली जाणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळालं. येत्या काही दिवसातच नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या