Wednesday, July 24, 2024
Homeअग्रलेखपाणी वापराचा विवेक वाढण्याची गरज

पाणी वापराचा विवेक वाढण्याची गरज

राज्याच्या अनेक शहरांत श्रावणसरी कोसळत आहेत. तथापि परिस्थिती गंभीर असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी जनतेचे लक्ष वेधले आहे. त्यांनी नुकतीच सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. धरणातील जलसाठ्याचा अंदाज घ्यावा, त्यानुसार काटकसरीने जलनियोजन करावे, असे आदेश संबंधितांना दिले. अनेक जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्ट महिन्यात पावसाने लोकांची आणि सरकारचीही निराशा केली. पशुधनाच्या चाऱ्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी घ्यावा, गवताच्या पेंढ्या तयार कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

भविष्यकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तथापि असे गृहीत धरून पाणी काटकसरीने वापरण्याच्या आवाहनाकडे लोकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. पाऊस किती झाला याचा अंदाज जनतेलाही येतच असतो. त्यांनी गंभीरपणे त्याकडे बघावे, अशी सद्यस्थिती आहे. राज्याच्या ३५८ पैकी २६४ तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातील ३ हजार धरणे फक्त ६१ टक्के भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के कमी आहे, असे सांगितले जाते. साडेतीनशेपेक्षा जास्त गावे व दीड हजार वाडयांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एरवी पावसाळा सुरु झाला की, टँकरची संख्या कमी होताना आढळते. तथापि यंदा ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी टँकर सुरु आहेत. सामान्यांनाही परिस्थितीचा अंदाज यावरून येऊ शकेल. जलसंवर्धन, जलसाठ्याचे सूक्ष्म नियोजन, शेतीसाठी ठिबक सिंचन सुविधा, हंगामी पावसाच्या प्रमाणानुसार पीक नियोजन अशा अनेक पातळ्यांवर सरकारचा विचार सुरु असेल अशी अपेक्षा! लोकांनीदेखील सामाजिक भान ठेवायला हवे. पाणी जपून वापरायला हवे. पाणीवापराच्या सवयींचे त्यांनीच पुनर्निरीक्षण करायला हवे.

लोक पाणी वापरत नाहीत तर त्याची उधळपट्टी करतात, असा तज्ज्ञांचा आक्षेप आहे. तो नाकारता येईल का? लोक वाट्टेल तसे पाणी वापरत नाहीत का? मुबलकतेमुळे बेफिकिरी वाढते. घराघरातील सवयींमध्ये छोटे-छोटे बदल केले आणि ते अंमलात आणले तरी पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. त्या सवयी कोणत्या हे लोकही जाणून आहेत. अन्न वाया घालवणे आणि पाण्याची नासाडी यांचाही अप्रत्यक्ष संबंध असू शकेल का? घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. ते अन्न तयार करण्यासाठी आणि खरकटी भांडी घासण्यासाठी पाण्याचा वापर होतोच. अन्न वाया गेले म्हणजे त्या प्रमाणात पाणीही वाया गेले, असे म्हणणे अयोग्य ठरू शकेल का? वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे, गृहनिर्माण संस्थामध्ये पावसाचे पाणी साठवणे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हेही उपाय योजले जाऊ शकतात. मुले पालकांचे अनुकरण करतात. पालकांनी पाणी जपून वापरले तर तेच संस्कार मुलांवर आपोआप होऊ शकतात. ती एक प्रकारे पाण्याची बचतच ठरू शकेल. सरकारी आणि

- Advertisment -

ताज्या बातम्या