Tuesday, April 23, 2024
Homeजळगावशेजार्‍याला पोरंग झाल म्हणून आपण पेढे वाटायचे का?

शेजार्‍याला पोरंग झाल म्हणून आपण पेढे वाटायचे का?

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

इकडे तिकडे बघण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group) खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपल्या पक्षाच काय ते बघावे, आणि भविष्यात कुठ रहाल त्याचा शोध घ्यावा. बाहेर तुमच काहीच राहिल नसून शेजार्‍याला पोरग झाल (Boy to the neighbor) म्हणून आपण पेढे (share sweet) वाटायचे, आपण वांझोटे आहात का? अशी जहरी टिका ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Rural Development Minister. Girish Mahajan) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर केली.

- Advertisement -

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

कर्नाटकमध्ये काँग्रेसने पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर राज्याचे ग्रामविकास व क्रिडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निकालावर बोलतांना ना. महाजन म्हणाले की, कर्नाटक मध्ये आम्हाला अपेक्षा होती त्या पद्धतीनं काम झालेलं नाही. आम्ही कमी पडलो का कमी पडलो याचा नक्की शोध घेणार असून इतक्या कमी जागा आपल्या येतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती. या सार्‍या बाबींचं आत्मपरीक्षण करू कारणमीमांसा करणार आहोत

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळVISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

. एक राज्य जिंकलं म्हणजे द्वेषाची दुकानदारी बंद झाली आणि प्रेमाची दुकानदारी सुरू झाली असं होत नाही. यूपीत निवडणुका झाल्या तेव्हा तुमचं प्रेम कुठं होतं, तिथं काँग्रेसची वाईट हार झाली काही ठिकाणी अँटी इन्कमबन्सी असते खूप दिवसांनी त्यांना विजय मिळाल्याने ते हुरळून गेले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणचोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदर

हनुमानाची गदा पाहण्यापेक्षा धनुष्यबाण कुठे ते बघा

ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपल्या शिवसेनेच बघावे. तुमची शिवसेना, तुम्ही कुठं आहात ते बघा, भविष्यात कुठं राहाल याचा शोध त्यांनी घ्यावा. हनुमानाची गदा पाहण्यापेक्षा तुमचा धनुष्यबाण कुठं आहे ते बघा. तुमचा धनुष्यबाण तुमच्याकडे राहिलेला नाही, तुमचे आमदार खासदार तुमच्याकडे राहिले नाहीत महाराष्ट्रात तुमचं काय आहे ते दाखवा, बाहेर तर तुमचं काहीच नाही. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना सारखी झाली असल्याची टिका देखील ना. महाजन यांनी केली.

नांद्रा, वावडदा, सावखेड्यात शॉर्टसर्किटमुळेे पिकांना आग

- Advertisment -

ताज्या बातम्या