Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedआरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण कमी!

आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण कमी!

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar-

‘आरोग्य केंद्रात बाळंतपण, सुरक्षित बाळंतपण’ Safe childbirth सारख्या उपक्रमांना राबवूनही ग्रामीण भागातील प्रसूती या आरोग्य केंद्रात होण्याचे प्रमाण वाढत नसल्याचे एकंदर चित्र आहे. त्यामुळे महिलांना आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त सुविधा दिल्या जाव्या व त्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाण वाढावे यावर भर दिला जात आहे. 

- Advertisement -

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची बाह्य आरोग्य तपासणी होणे आवश्यक असताना अनेक केंद्रांमध्ये दररोज दहा रुग्णांचीही तपासणी होत नाही आणि ज्या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाण कमी आहे, अशा आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाया करण्यात येतील, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्याप्रकारे सेवा मिळणे आवश्‍यक आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी हजर राहणे आवश्यक आहे. परंतु, अनेक ठिकाणी ते हजर राहत  नसल्यामुळे ग्रामस्थांना चांगली सेवा मिळत नाही. काही आरोग्य केंद्रांमध्ये महिन्याला ३ ते ४ हजार रुग्ण तपासणीसाठी येतात तर काही ठिकाणी महिन्याला पाचशेच्या वर आकडा जात नाही, हे चित्र विचार करायला लावणारे आहे. संबंधित डॉक्टर व कर्मचारीच याला जबाबदार आहेत. ही संख्या वाढावी यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आरोग्य केंद्र गावापासून दूर असेल तर त्याठिकाणी आरोग्य विभागाच्या टीमने गावांमध्ये जाऊन तपासणी करावी, असे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात गर्भवती महिला (Pregnant women) नियमित तपासणीसाठी येत असतात. संबंधित आरोग्य केंद्रांमध्ये नोंद केली जात असताना प्रत्यक्ष त्याठिकाणी प्रसूतीसाठी महिला येत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. नोंदणी एक हजारची होत असताना २५० महिलांची प्रसूती तरी याठिकाणी होणे आवश्‍यक आहे, याकडे विकास मीना यांनी लक्ष वेधले. काही ठिकाणी महिला ग्रामीण रुग्णालयात जातात तर अनेक जण शहरातील रुग्णालयांमध्ये जातात. ही परिस्थिती बदलली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या. यामध्ये सुधारणा झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या