धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 2006 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात 57 रुग्ण आढळून आले. तर धुळ्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
दुपारी जिल्हा रुग्णालय येथील 150 अहवालांपैकी 31 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नरव्हाळ 11, नेर एक, लामकानी एक, खेडे एक, महाराणा प्रताप कॉलनी एक, ग.नं.4 मध्ये दोन, ग.नं.5 मध्ये तीन, मोगलाई ग.नं.2 एक, साक्रीरोड साईकृपा सोसायटी दोन, पद्नाभ नगर एक, जे.बी. रोड एक, पारिजात कॉलनी इंदीरा गार्डन एक, अलंकार सोसायटी एक, साक्री रोड तुळजाई कॉलनी एक, आग्रा रोड शेरेपंजाब जवळ दोन, अशोक नगर एक या रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी लॅबमधील 39 अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात आर्वी दोन, विटाई एक, मलेरिया ऑफिसजवळ एक, मिरच्या मारुती ग.नं.5 एक, शाळा नं.9 ग.नं.5 एक, राम मंदिर नेहरु नगर वाडीभोकर रोड एक, सेवादास नगर एक, मालेगाव रोड दोन, पंचवटी एक, विकास कॉलनी एक, कृष्णानगर गवळी वाडा एक रुग्णांचा समावेश आहे.
भाडणे, साक्री, सीसीसी येथील 76 अहवालांपैकी दहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात कासारे नऊ, सामोडे एक यांचा समावेश आहे.
महानगरपालिका पॉलिटेक्नीक सीसीसी येथील 15 अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यात बडगुजर कॉलनीत एक रुग्ण आढळून आला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील चार अहवालांपैकी देवपुरातील प्रमोद नगर 61 वर्षीय पुरुष, ग.नं.6 23 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 2006 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण धुळे शहर व शिरपूरात आढळून येत आहेत.