Friday, May 3, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या 365 वर

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या 365 वर

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

येथील कोविड केअर सेंटरमध्ये आज केलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात नेवासा शहरातील 09 व्यक्तीसह तालुक्यातील 21 व्यक्ती तर खाजगी लॅब मधील 2 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 3 व्यक्ती करोना बाधीत आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

- Advertisement -

आज नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे 116 व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यामध्ये नेवासा शहरातील 09, घोडेगाव 03, उस्थळ दुमाळा 03, सोनई 05, सलाबतपूर 01 येथील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 95 व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आले आहे. तसेच खाजगी लॅब मधून आलेल्या अहवालात खेडलेकाजळी येथील दोन व्यक्ती व जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात उस्थळ दुमाला येथील दोन तर भेंडा बुद्रुक येथील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहे.

तालुक्यातील रुग्ण संख्या 365 वर गेली आहे. 1 व्यक्तीला डिस्चार्ज दिल्याने 234 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. 8 कोरोना बाधीत व्यक्तींचा आज पर्यंत मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या