Sunday, May 5, 2024
Homeराजकीयठाकरे गटाला पुन्हा धक्का; आता 'हे' कार्यालय देखील शिंदे गटाच्या ताब्यात

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; आता ‘हे’ कार्यालय देखील शिंदे गटाच्या ताब्यात

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने (Election Commission) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यालय आणि पदांवर ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे…

- Advertisement -

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्यातील सत्तासंघर्षावर (Power Struggle) आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. त्यातच आता शिंदे गटाने संसदेतील शिवसेना कार्यालयावरही ताबा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी…; राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

दरम्यान, कालच शिंदे गटातील आमदारांनी (MLA) महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा देखील ताबा घेतला होता. त्यानंतर आज संसदेतील शिवसेना कार्यालयाचा एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी ताबा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केंद्रीय सचिवालयाला यासंदर्भात पत्र लिहून संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे गटाला मिळावा, अशी मागणी केली होती.

उद्धव ठाकरेंना दिलासा! ‘त्या’ याचिकेवर सुप्रीम कोर्ट घेणार उद्या सुनावणी

- Advertisment -

ताज्या बातम्या