Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकवृद्ध महिलेला मारहाण करून दागिने केले लंपास

वृद्ध महिलेला मारहाण करून दागिने केले लंपास

वावी । वार्ताहर Vavi

- Advertisement -

तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी असलेल्या हरणाबाई विठोबा पेखळे या गावानजीक असलेल्या वस्तीवर एकटे असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण करीत त्यांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचा प्रकार रविवारी (दि.22) मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

गेल्या काही दिवसांपासून वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरांची दहशत वाढली असून रात्रीच्या वेळेस भुरटे चोर पिस्तुलचा धाक दाखवून लुटमार करत असल्याच्या घटना घडत आहे. दोन आठवड्यापासून चोरीचे सत्र सुरू असताना वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी व सेवकांकडून कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. शिर्डी महामार्गावर गेल्या आठवड्यापासून चोरीचे सत्र घडत आहेत.

त्यात अज्ञात चोरट्यांनी पांगरी येथील वृद्ध महिलेस मारहाण करुन लुटल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली हवालदार बैरागी करत आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : Vaibhav Suryavanshi ची वादळी शतकीय खेळी; दिग्गजांकडून...

0
मुंबई | Mumbai  आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफान फटकेबाजीने हवा केली आहे. काल (सोमवारी) जयपूर येथे राजस्थान रॉयल्स...