Saturday, May 18, 2024
Homeनाशिकबांधकामांच्या ऑनलाईन मंजुरी प्रक्रिया गतिमान

बांधकामांच्या ऑनलाईन मंजुरी प्रक्रिया गतिमान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची ऑनलाईन मंजुरी प्रक्रिया गतिमान झाली असून या माध्यमातून प्रकरणांचा वेगाने निपटारा होत असल्याचे निदर्शनास आले असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेच्या ऑनलाईन प्रणालीत नेहमीच अडचणी येत असल्याने बर्‍याच वेळा प्रशासनाला ऑफलाईन प्लॅन मंजूर करावे लागत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत ही यंत्रणा सक्षम झाली असल्याने विकासकामांच्या मंजुरीला गती मिळाली असल्याचे चित्र आहे.

मनपाच्या नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन मंजुरीसाठी 10,659 प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील 9,336 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 154 प्रकरणे बाद झाली आहेत. उर्वरित प्रकरणांची प्रक्रिया गतिमान असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महानगरपालिकेत मंजुरीसाठी येणार्‍या प्रकरणांची संख्या या वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीत रोडावत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षात बांधकामाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे यावर्षी त्यामानाने कमी प्रकरणे दाखल होत आहेत. मनपाने मागील आर्थिक वर्षात 236 कोटींचा टप्पा पार करून 243 कोटींचा विक्रमी महसूल मनपाच्या तिजोरीत दिला होता. त्या तुलनेत यंदाच्या वसुलीची गती सुरुवातीच्या तिमाहीत 30 ते 35 कोटींची मजल गाठू शकल्याने यंदाचे टार्गेट पूर्ण होणे कठीण होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या