नाशिक । प्रतिनिधी Nashik
पंचवटी व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित व ‘ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ प्रायोजित ‘पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’चा शानदार समारोप करण्यात आला. प्रदर्शनाच्या तीनही दिवस परिसरातील नागरिकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली.
मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रशस्त मार्ग खुल्या करणार्या प्रदर्शनाच्या तीन दिवसांत बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘देशदूत’ वठवत असलेली भूमिकाही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भावली. एक्स्पोचे सहप्रयोजक हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तर फायनान्शियल पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र हे होते.
बांधकाम व्यावसायिक संस्थांचे सुमारे 30 स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले होते. सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एक्स्पोला एन.राका अॅड एजन्सीचे नितीन राका, सायली अॅॅड. राजेश शेळके या मान्यवरांनी भेट दिली. एक्स्पो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समीर पाराशरे, रोशन कुटे, भगवंत जाधव, आनंद कदम, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी प्रयत्न केले.
3 बीएचके फ्लॅटची विक्री
हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या दिंडोरी रोड, सिनर्जी हॉस्पिटल मागील श्री साई रेसिडेन्सी या आलिशान प्रकल्पातील 3 बीएचके फ्लॅटची आज विक्री झाली. परिसरातील डॉ. उनेचा यांनी साईट व्हिजिट करून त्यांना प्रकल्प पसंत पडल्याने तेथे घर बुक केले आहे.