दोंडाईचा Dondaicha। प्रतिनिधी
दि.18 रोजी दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला (statue) एका मालवाहू ट्रकने (Freight truck) धडक दिल्याने पुतळ्याचे नुकसान झाले. यामुळे जनतेची जनभावना तीव्र झाली अशातच पुतळयाभोवतीचा अतिक्रमणाचा (Encroachment) विषय पुढे आल्याने तेही तत्काळ काढण्यात आले. पंरतू केवळ पुतळयाभोवतीच नव्हे आता संपूर्ण शहरातील अडथळे निर्माण करणारे अतिक्रमण काढा, अशी भावना सर्वसामान्य जनतेची आहे.
पालिकेवर सध्या ना रावल गट ना देशमुख गट अशा कोणत्याही गटाची सत्ता नाही, आता मालक प्रशासक (Administrator) आहेत आणि ते ही दंडाधिकारी असल्याने जनतेतून लोहा गरम है, मार दो हातोडा अशीच भावना दिसून येत आहे.
मालवाहू ट्रक (Freight truck) शहरातूनच प्रवास करतात. यापैकी एका ट्रकने चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कठड्याला जोरदार धक्का दिला. यामुळे पुतळ्याचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भिती निर्माण झाली. पोलिसांचा ताफा शहरात दाखल झाला. या पुतळयाला अतिक्रमणामुळे (Encroachment) धक्का लागला म्हणून जमावाने आक्रमक भूमिका घेत आजच अतिक्रमण काढून पुतळयाभोवतीची जागा मोकळी करण्याची मागणी लावून धरली अन्यथा शहरात पुन्हा भव्य मोर्चा काढण्याचा गंभीर इशारा अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, प्रशासक सुदाम महाजन, मुख्याधिकारी प्रविण निकम यांच्या समक्ष दिला.
अधिकार्यांनी चर्चा करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती लक्षात घेवून तात्काळ पुतळयाभोवतीचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या बैठकिला माजी मंत्री आ.जयकुमार रावल, माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, यांच्यासह शिवसेना, कॉग्रेस, आर.पी.आय. असे सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. जनभावना तीव्र होत्या. जमावासमोर कोणत्याही राजकारणी मंडळीला काहीच सुचत नव्हते, राजकारणी मंडळी दरवेळी आप- आपल्या राजकिय हेतूसाठी सर्रासपणे अतिक्रमणास (Encroachment) पाठबळ देतात हे प्रत्येक शहरात होते.
पंरतू जमावासमोर कुणाची हिम्मत झाली नाही, हा सर्वसामान्य जनतेचा राजकारणी पुढार्यांवर नक्कीच विजय असला तरी पण केवळ पुतळया भोवतीचेच अतिक्रमण कशाला, आता संपूर्ण शहरात रहदारीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण (Encroachment) काढण्याचा सूर सर्वसामान्यांचा आहे. म्हणूनच जनता म्हणतेय प्रशासक साहब लोहा गरम है.. मार दो हातोडा. नगरपरिषदेवर राजकीय सत्ता नसून प्रशासकाच्या (Administrator) हाती कारभार असल्याने यात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यताच नाही. परिणामी यानिमित्ताने शहरातील अतिक्रमणाचे निर्मुलन होवू शकेल.
माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांचा सल्लाही मोलाचा
रावल नगर चौफुली ते महाराणा प्रमापसिंह यांच्या पुतळयाला जोडणार्या मालपूर रोड लगत मातंग समाजाची वस्ती आहे. या समाजाला शासनाच्या योजनेतून एखाद्या शासकिय जागेवर घरकुल योजना राबवून त्यांना मोफत घरे देवून तेथील अतिक्रमण काढून तो रस्ता मोकळा करावा. कारण या रस्त्यावरून जेमतेम एकच वाहन जावू शकते आणि हा लोकांना साक्रीकडे आणि धुळे नंदूरबार बायपास रसत्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.
जेणेकरून मातंग समाजाची देखील सोय होईल आणि या गरीबांना हक्काची घरे देखील मिळतील. पंरतू याकडे किमान आतातरी लक्ष द्यावे, अशी सूचना पालिकेच्या प्रशासकांना माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख (Former Minister Dr. Hemant Deshmukh) यांनी केली. त्यांनी दिलेल्या या मोलाच्या सल्ल्याचा प्रशासकांनी नक्कीच विचार करावा, अशी भावना सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली.