पिंपळगाव बसवंत | वार्ताहर Pimpalgaon Basvant
पिंपळगाव बसवंत येथे महिलांची अंतर्वस्त्र चोरणार्या विकृताला नागरिकांनी पकडून चोप देण्याची घटना घडली आहे.
एका नगरात रोज महिलांच्या अंतर्वस्त्र चोरीच्या घटना घडत होत्या. हे प्रमाण वाढतच चालले होते. पण या चोरीबाबत कोणाकडे तक्रार नोंदवावी, हा प्रश्न पडला होता. ही चोरी नेमके कोण करते, आणि कधी करते, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
येथील नगरातील अनेक घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर पडतात. घरी बहुतांशी महिला वर्ग गृहिणी म्हणुन असतात आणि तेही दार बंद करून घरातील कामाच्या गडबडीत उन्हाची तीव्रता वाढल्याने बहुतेक घरातील सदस्य आराम करतात. याचाच फायदा घेत एक विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती महिला वर्गाचे अंतरवस्त्र बाहेरून चोरून नेत असे. ही घटना म्हणजे महिलांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा असा प्रकार वाटत होता.
एका घटनेत तर कहरच झाला एका महिलेच्या अंतर्वस्त्रावर चोरट्याने आपला मोाबाईल नंबर लिहून टाकला. संबंधित महिलेने या घाणेरड्या प्रकाराबद्दल पतीला सांगितले. पण यात पती-पत्नीतच घरात वाद झाला. पतीने पत्नीवर संशय घेत वाद बराच वाढला. अखेर पतीच्या एका मित्राने सदर महिलेला विकृत स्वभावाच्या व्यक्तीला प्रेमाचा फोन करायला लावला व भेटायला येे असे कबूल करून घेतले.
विकृत मनोवृत्तीच्या एका व्यक्तीने त्याला प्रतिसाद देत आनंदीत होत संबंधित महिलेला भेटण्यासाठी तयार झाला. एका ठिकाणी भेटीची वेळ ठरली. कुटुंबातील सदस्य व संबंधित मित्राने विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीला सापळ्यात कसे अटकावयाचे याबाबत प्लॅन तयार केला.
वार व वेळ ठरत सदर महिला भेटायला गेली. भेटीच्या ठिकाणी विकृताशी महिलेचे बोलणे सुरू झाले. आजुबाजूला दडुन बसलेल्या कुटुंबातील सदस्य व मित्र परिवाराने विकृताला घेरावा घालत पकडले आणि त्यास चोप दिला. गर्दी जमा होताच पुन्हा जास्त चोप बसला, यावर सदर विकृत व्यक्तीने माफी मागत यापुढे असे होणार नाही, हे कबूल केले.
यावर कळस म्हणजे मनोवृत्तीच्या व्यक्तीने सदर मोबाइल नंबर मीच लिहिला पण तो या महिलेसाठी नव्हताच तर त्याच्या मुलीसाठी होता, हे बोलायला पण तो डगमगला नाही. मला वाटले ते अंतरवस्त्र मुलीचे आहे, म्हणून लिहिला. बघणार्यांनी डोक्यावर हात मारत पुन्हा चोप देत घरच्या व्यक्तींना बोलावून ताब्यात दिले. सदर व्यक्तीचे लग्न देखील झाले आहे, पण पत्नी निघुन गेल्यामुळेच त्याच्यावर परिणाम झाल्याचे घरच्यांनी कबूल केले.





