धुळे dhule । प्रतिनिधी
खानदेश कुलस्वामिनी (Khandesh Kulaswamini) एकवीरा देवी मंदिरात (Ekvira Devi Temple) 5 एप्रिलपासून चैत्र यात्रोत्सवाला (Chaitra festival) सुरूवात होत असून चैत्र चावदसला मान- मानता, जाऊळ, शेंडी, कुळधर्म कार्यक्रम होणार असून अभिषेक, पूजापाठ करण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. दरम्यान यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
एकवीरा देवीचा चैत्र यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. एकवीरा देवीची रथ मिरवणूक दि. 7 रोजी काढण्यात येणार आहे. देवीची रथ मिरवणूक नव्याने बनविण्यात आलेल्या संपूर्ण पितळी रथातून काढण्यात येणार आहे. मिरवणूक शहरातील पारंपारिक मार्गावरून काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गांवर भाविकांनी रांगोळी काढून व फुलांची सजावट करून रथयात्रेचे स्वागत करावे, असे आवाहन श्री एकवीरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टने केले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
यात्रेच्या काळात देवीचे दर्शन करण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. मंदिराच्या बाहेर मंडप टाकण्यात आले असून पाण्याची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पांझरानदीच्या पात्रात विविध व्यवसायिक दुकाने थाटण्यात आली आहे. मंदीर परिसराजवळ पाळणेही उभारण्यात आली आहेत.
यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंडप देखील टाकण्यात आला आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंडप उभारण्यात आला आहे. तर नदी पत्रात पुजेचे साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. तसेच रसवंती, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीही दुकान थाटली असून नदी पात्रात मनोरंजनाची साधने, विविध प्रकारचे पाळणे बांधणीचे काम वेगात सुरु आहे. काही पुर्ण देखील झाले आहे. दरम्यान यात्रा कालावधीत महापालिकेतर्फे विविध सेवा-सुविधा पुरविण्यात येत असून त्याची नुकतीच महापौर प्रतिभा चौधरी यांनी संबंधित पदाधिकारी व अधिकार्यांसह पाहणी केली.