Saturday, April 26, 2025
Homeनाशिककालिदास मध्ये रंगणार 'बार्दो' नाटकचा प्रयोग

कालिदास मध्ये रंगणार ‘बार्दो’ नाटकचा प्रयोग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लॉकडाऊनच्या विळख्यातून नुकतीच बाहेर पडलेली रंगभूमी हळूहळू उजळू लागलेली आहे. सर्वच रंगकर्मी नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्या मनोरंजनासाठी कंबर कसून तयार होताना दिसतायत. अशातच प्रेक्षकांच्या भेटीस आतुर अशा बऱ्याच नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत.

- Advertisement -

असेच एक झी नाटय गौरव २०२० Zee Natya Gaurav 2020 मध्ये सर्वाधिक ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले नाशिकचे लेखक शंतनू चंदात्रे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित ‘बार्दो’ Bardo हे नाटक शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता कालिदास, नाशिक येथे पहिला प्रयोग सादर होणार आहे.

या नाटकाची प्रकाशयोजना यश नवले यांनी तर नेपथ्य अमेय भालेराव संगीत ओंकार घाडी यांचे आहे. तर समिर सुमन, भक्ती तार्लेकर, रमांकांत जाधव, शुभम वेले, अमोघ पिसाळ, जय चव्हाण, अथर्व लखलगावकर, दुर्गेश बुधकर यांच्या भुमिका आहे.

दरम्यान ‘बार्दो’ नाटकाचे वर्णन करताना दिग्दर्शक अनुप माने यांनी सांगितले की, “तिबेटी बौध्द धर्मात बार्दो ही संकल्पना मृत्यूनंतर आणि पुनर्जन्माच्या आधीची अवस्था आहे. हे नाटक मृत्यूच्या पलीकडे असलेल्या एका वेगळ्या मितीत प्रेम, असक्ती, वैमनस्य आणि जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतं.”अशा या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन रसिक प्रेक्षकांना यावेळी त्यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...