Monday, November 25, 2024
HomeनाशिकNashik News : हतगड येथे पाच दिवसांपासून चक्का जाम आंदोलन; वाहतूक ठप्प,...

Nashik News : हतगड येथे पाच दिवसांपासून चक्का जाम आंदोलन; वाहतूक ठप्प, प्रवाशांचे भर पावसात हाल

हतगड | वार्ताहर | Hatgad

१७ संवर्ग पेसा भरती (Pesa Recruitment) मागणी करीता माजी आमदार जे.पी.गावित यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ ऑगस्ट पासून हतगड, बोरगाव तरुणांच्या (Youth) वतीने हतगड येथे चक्का जाम आंदोलन (Agitation) छेडले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain Update : मनमाड, येवला, चांदवडसह निफाडकरांना दिलासा

नाशिक-सुरत महामार्ग (Nashik Surat Highway) हतगड (Hatgad) येथे चक्का जाम आंदोलन सुरु असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गुजरात राज्यातील (Gujarat State) बससेवा सापुतारापर्यंत उपलब्ध असून नाशिककडे (Nashik) जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हतगड येथे पर्यटनासाठी फिरण्याकरिता परराज्यातून आलेल्या प्रवाशांचे मुसळधार पावसात हाल होतांना दिसून येत आहे.

हे देखील वाचा :  Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

हतगड येथे दिवसभर पाऊस (Rain) सुरु असून येथील तरुणांनी ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता आंदोलनात सहभागी होत आपला पाठिंबा दिला आहे. शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत चक्का जाम आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय हतगड बोरगाव परिसरातील तरुण आदिवासी वर्गाने घेतला आहे.

हे देखील वाचा :  Nashik Crime News : मद्यधुंद चालकाने उडवल्या तीन गाड्या; पोलिसांनी काही तासांत घेतले ताब्यात

तसेच हे आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसत आहेत. यात नवनाथ पवार,लखन पवार, हिरा गावित, रंगनाथ पवार, सचिन राऊत, जीवन मोहन, पुंडलिक भोये, काशिनाथ भोये, सोमनाथ गायकवाड, मधुकर वाघमारे,संदीप भोये, यांच्यासह आदींचा समावेश आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या