छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
शहरात दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणलेले असताना चब्न्क एका दुकानासमोरून दुचाकी चोरी करताना पोलीसच सीसीटीव्हीत अडकल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस दलाची बदनामी झाल्याच्या घटनेमुळे पोलीस आयुक्तांनी थेट सिटी चौक पोलीस ठाणे गाठले. घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिले. या खळबळजनक घटनेने छत्रपती संभाजीनगरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय
शहरातील शहानूरवाडी, शम्सनगरातील नजीर कासीम शेख (वय ५१) यांनी मुलासाठी दुचाकी (एमएच २० ईयू ८९३७) घेतली होती. मुलगा हा संभाजीपेठेतील आशा ट्रेडर्स या दुकानावर काम करतो. मंगळवारी रात्री दुचाकी सुरू होत नसल्याने त्याने दुचाकी दुकानासमोर उभी करून मालकाची दुचाकी घेऊन घरी गेला होता. काल बुधवारी सकाळी दुकानासमोरून दुचाकी गायब झाल्याचे दिसले. नजीर शेख यांनी दिवसभर दुचाकीचा शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. दुचाकी चोरी गेल्याचे समजल्यावर त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीसीटीव्हीत अडकले दोन पोलीस सिटी चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुभाष हिवराळे यांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सहायक निरीक्षक सुनील कराळे यांच्याकडे सोपवला. कराळे यांनी तपासाला सुरुवात करत दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना धक्काच बसला. रात्री गस्तीवर असलेले खाकी वदींतील दोन पोलीस कर्मचारी हे दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. दुचाकी सुरू होत नसल्याने त्यांनी पोलिसांच्या वाहनाला टो करून दुचाकी नेल्याचे दिसून आले. पोलिसांनीच दुचाकी चोरल्याचे समोर आल्यावर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
नोंद घेतली नाही
सिटी चौक पोलीस ठाण्यात रात्र गस्तीवर असलेले घोडके आणि जारवाल या दोघांनी दुचाकी दुकानासमोरून ठाण्यात आणली. ठाण्याच्या आवारात त्यांनी पहाटे ४ वाजता ही दुचाकी लावल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. मात्र, दुचाकी आणल्यानंतर त्यांनी दुचाकी जप्त केल्याची नोंद न केल्याने त्यांच्यावरचा संशय बळावला. दिवसभरही त्यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना दिली नाही. सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांचे बिंग फुटले.