Saturday, May 18, 2024
HomeराजकीयED च्या नोटीसीव्दारे होतेय केंद्राचे राजकारण

ED च्या नोटीसीव्दारे होतेय केंद्राचे राजकारण

जळगाव – Jalgaon

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना ‘ईडी’ कार्यालयामार्फत चौकशीसाठी उपस्थित रहाण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपाचे कट्टर समर्थक एकनाथराव खडसे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच भाजपाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी ‘इडी’लावाल तर ‘सीडी ’काढली जाईल असे वक्तव्य केले होते.

- Advertisement -

तत्कालीन भाजपा सेना काळात भोसरी भुखंड प्रकरणी तीनचार वेळा चौकशी होउन निकाल देखिल मिळाला आहे. परंतु केवळ सुडाच्या भावनेपोटी ‘इडी’ च्या नोटीसीव्दारे केन्द्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोपांसह घोषणाबाजी करीत आज रविवार दुपारी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.

यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, वाल्मिक पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, सरचिटणीस अशोक पाटील, अजय बढे, रोहीत सोनवणे, दिलीप माहेश्वरी, ॲड.राजेश गोयर, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिल माळी, बंडू भोळे, ममता तडवी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या