Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News: जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी चुरस वाढणार; आरक्षण सोडत जाहीर

Nashik News: जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी चुरस वाढणार; आरक्षण सोडत जाहीर

नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गण प्रारूप रचनेबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गट व गणांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला नसून नवीन प्रारुप आराखड्यानुसार ७४ गट व १४८ गण यंदाच्या निवडणुकीसाठी राहणार आहे. पुर्वीच्या संख्येत एक गट व दोन गणांची वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व ओझर या दोन नगरपालिका झाल्याने येथील गटांची संख्या दोन ने कमी झाली आहे. तर चांदवड, सुरगाणा, व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढल्याने गटांची संख्या ७४ तर गणांची संख्या १४८ इतकी झाली आहे.

- Advertisement -

अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी खुले झाल्याने या पदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपद मिळवण्यासाठी आत्तापासूनच इच्छुकांकडून प्रयत्न सुरु होणार आहे.

YouTube video player

असे आहे आरक्षण
नाशिक, पुणे, छ. संभाजीनगर, सिंदुदुर्ग, रायगड, बुलढाणा, यवतमाळ, जळगाव – सर्वसाधारण
ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली- सर्वसाधारण महिला
पालघर, नंदूरबार – अनुसुचित जमाती
अहिल्यानगर, अकोला, वाशिम – अनुसुचित जमाती महिला
सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा, – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धुळे, रत्नागिरी, सातारा, जालना, नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
वर्धा, परभणी – अनुसुचित जाती
बीड, चंद्रपूर – अनुसुचित जाती महिला

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...