भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ( indian cricket teams former captain mahendra singh dhoni) याने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (international cricket) निवृत्ती घेत असल्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला होता. धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी देखील धोनीला भावुक पत्र लिहून त्याचे कौतुक केले आहे. धोनीने स्वतः Twit करत या बाबत माहीती दिली आहे.
महेंद्रसिंग धोनी याने म्हंटले आहे की, “कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाचे आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असं त्यांना वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद !”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हंटले आहे की, “१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये (tredmark style) म्हणजेच एक लहान व्हिडिओ शेअर (share) केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत. तुझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीकडे आकडेवारीच्या नजरेने पाहता येईल. तू सर्वात यशस्वी कर्णधार ठरलास. भारताला तू अग्रेसर बनवण्यामध्ये मोलाचे योगदान दिलं. इतिहासामध्ये तुझं नाव सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नोंदवलं जाईल. कठीण प्रसंगी तिच्यावर निर्भर राहणे आणि सामना संपवण्याची तुझी शैली खास करुन २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (2011 wold cup final) सर्वसामान्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. तो पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील. महेंद्र सिंह धोनी हे नाव केवळ खेळातील आकडेवारी आणि सामना जिंकण्याच्या शैलीसाठी लक्षात राहणार नाही. तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे चुकीचं ठरेल. तुझे योगदान हे आश्चर्यचकित करणारे आहे असंच म्हणता येईल. एका लहानश्या शहरामधून सुरु करुन तू राष्ट्रीय पातळीवर आला आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि महत्वाचं म्हणजे भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीस. तुझी प्रगती आणि कामगिरी ही करोडो भारती तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तुझ्याप्रमाणे ते अगदी नावाजलेल्या शाळा, कॉलेजांमध्ये गेले नाहीत. त्यांचे कुटुंबही जास्त प्रभावशाली कुटुंबांपैकी नाही मात्र आपल्यामधील कौशल्याच्या जोरावर त्यांनी तुझ्याप्रमाणे यश मिळवलं आहे अशांसाठी तू प्रेरणास्थान आहेस. तू तरुण भारताचा खरा चेहरा आहेस. ज्या भारतामध्ये तुमचे आडनाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे. यावर त्यांचा प्रवास ठरत नाही तर तरुण स्वत: त्यांची ओळख निर्माण करुन वाटचाल करतात. आपण कुठून आलो आहोत यापेक्षा कुठे चाललो आहोत हे अधिक महत्वाचे असते याच नियमानुसार तू अनेक तरुणांना प्रेरणा दिली.”