Saturday, May 4, 2024
Homeनगरकोतवाली, तोफखाना पोलीस ठाणे विभाजनाचा प्रस्ताव रखडला

कोतवाली, तोफखाना पोलीस ठाणे विभाजनाचा प्रस्ताव रखडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यांच्या विभाजनासह शहरासाठी एक ऐवजी दोन पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त होण्यासाठी करण्यात आलेला प्रस्ताव रखडला आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून नगर शहराचा विस्तार होत आहे. केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, तपोवन रोड, कल्याण रोड आदी महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. पर्यायाने या भागातील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत आहे. सद्यस्थितीत नगर शहरात कार्यरत असलेल्या कोतवाली व तोफखाना या दोन पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतच हा सर्व भाग येत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने व वाढती गुन्हेगारी लोकसंख्या, रहदारी आदींच्या पार्श्वभूमीवर केडगाव, बोल्हेगाव, सावेडी भागात नागरिकांकडून स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी सातत्याने होत आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने केडगाव व सावेडी या दोन नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर केलेला आहे. मात्र, अद्यापही हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतच आहेत.

तसेच, पोलीस ठाण्यांचे विभाजन झाल्यानंतर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरासाठी दोन पोलीस उपअधीक्षक असावेत, असा प्रस्तावही करण्यात आला होता. कोतवाली, केडगाव, भिंगार व नगर तालुका यासाठी एक व तोफखाना, सावेडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी एक असे दोन स्वतंत्र पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असावेत, असा प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठविला होता. मात्र, अद्यापही प्रस्ताव रखडले आहेत.

एसपी ओला यांच्याकडून अपेक्षा

तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोतवाली, तोफखाना पोलीस ठाणे विभाजनाच्या प्रस्तावासाठी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला होता. तसेच त्यांनी शहरासाठी दोन पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असावेत, असा प्रस्तावही पाठविला होता. यासंदर्भात सध्याच्या शिवसेना-भाजप सरकारकडे पाठपुरवा होणे आवश्यक आहे. नव्याने आलेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यासाठी पाठपुरावा करीत अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या