Saturday, July 27, 2024
Homeनगरशिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची संरक्षक भिंत चार ठिकाणी कोसळली

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची संरक्षक भिंत चार ठिकाणी कोसळली

रांजणगाव देशमुख | वार्ताहर

साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाची सरक्षक भिंत काकडी-तळेगाव कडे जाणा-या रस्त्याच्या बाजुने तसेच कसारेच्या बाजुने चार ठिकाणी गुरुवारी रात्री पावसामुळे कोसळली आहे.

- Advertisement -

सरक्षक भिंत कोसळुन विमानतळावरील पाणी अनेक शेतक-यांच्या शेतात गेले त्यामुळे शेतक-यांचे यात नुकसान झाले आहे. सरक्षक भिंत कोसळल्यामुळे विमानतळाच्या सरक्षणाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमानतळाची सरक्षक भिंत पडण्याची ही तिसरी घटना आहे. यापुर्वीही दोनदा विमानतळाची सरक्षक भिंत कोसळली होती. सरक्षक भिंतींचे काम चालु आसतांना स्थानिकांनी हे काम निकृष्ठ होत आसल्याची तक्रार करण्यात केली होती मात्र तेव्हाच्या आधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. सरक्षक भिंत पडल्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सातत्याने सरक्षक भंत कोसळत असतांना विमानतळ विकास प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अगदी निकृष्ठ पध्दतीने या सरक्षंक भिंतीचे काम करण्यात आले असल्याचे पाहिल्यानंतर सर्वसामान्यांच्या लक्षात येते. मात्र विमानतळ प्राधिकरणाच्या हे लक्षात येत नाही हे विशेष.

विमानतळ सुरु झाल्यानंतर सर्वाधिक पंसती या विमानतळास मिळाली. मात्र प्रवाशांच्या सोयीच्या बाबतीत नेहमीच हे विमानतळ चर्चेत असते. नेहमीच दृश्यमानतेचा विषय येथे चर्चेत असतो. अनेक वेळेस कमी दृष्यमानतेमुळे विमानांचे जाणे व येणे रद्द होते. तसेच उन्हाळ्यात प्रवाशी कक्षात वातानुकुलीत यंत्रणानाही कमी पडत होत्या.

विमानतळाच्या भिंतीचे काम चालु असतानाच आम्ही काम निकृष्ठ होत असल्याचे तात्कालीन अधिका-यांच्या लक्षात आणुन दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

प्रभाकर गुंजाळ

साईभक्तांचा मोठा प्रतिसाद या विमानतळास मिळतो. मात्र विमानतळ विकास प्राधिकरण सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करते. ग्रामपंचायतीचे कराचे पैसे देण्याकडेही कानाडोळा करत आहे.

कानिफनाथ गुंजाळ

- Advertisment -

ताज्या बातम्या