Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारजिल्हयातील तब्बल 177 शाळांचा निकाल 100 टक्के

जिल्हयातील तब्बल 177 शाळांचा निकाल 100 टक्के

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (Result of tenth examination) आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा एकुण निकाल 94.97 टक्के लागला. जिल्हयातील 405 शाळांपैकी तब्बल 177 शाळांचा निकाल (School results) शंभर टक्के (hundred percent) लागला आहे.

- Advertisement -

इयत्ता दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात जिल्हयाचा निकाल 94.97 टक्के लागला. जिल्हयातील 405 शाळांपैकी तब्बल 177 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 48, शहादा तालुक्यातील 47, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी 18 तर धडगाव तालुक्यातील 12 शाळांचा समावेश आहे.

शहादा तालुक्याचा सर्वाधिक निकाल

नंदुरबार जिल्हयात शहादा तालुक्याचा सर्वाधिक तर तळोदा तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. अक्कलकुवा तालुक्यात 2 हजार 526 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 2 हजार 376 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 1 हजार 187 विद्यार्थी व 1 हजार 189 विद्यार्थिनींचा समावेश आहे. अक्कलकुवा तालुक्याचा 94.06 टक्के निकाल लागला.

धडगाव तालुक्यात 1 हजार 342 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1 हजार 272 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 597 विद्यार्थी व 675 विद्यार्थिनींचा समावेश आहे. धडगाव तालुक्याचा 94.78 टक्के निकाल लागला.

नंदुरबार तालुक्यात 5 हजार 710 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 5 हजार 445 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 2 हजार 934 विद्यार्थी व 2 हजार 511 विद्यार्थिनींचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्याचा 95.35 टक्के निकाल लागला.

नवापूर तालुक्यात 3 हजार 572 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 3 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 1 हजार 790 विद्यार्थी व 1 हजार 622 विद्यार्थिनींचा समावेश आहे. नवापूर तालुक्याचा 95.52 टक्के निकाल लागला.

शहादा तालुक्यात 5 हजार 41 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 4 हजार 847 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 2 हजार 628 विद्यार्थी व 2 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश आहे. शहादा तालुक्याचा 96.15 टक्के निकाल लागला.

तळोदा तालुक्यात 1 हजार 834 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1 हजार 666 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 866 विद्यार्थी व 800 विद्यार्थिनींचा समावेश आहे. तळोदा तालुक्याचा 90.83 टक्के निकाल लागला.

पुनर्परिक्षार्थींचा 59.24 टक्के निकाल

जिल्हयात 346 पुनर्परिक्षार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 18 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 21 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 143 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परिक्षार्थींचा निकाल 59.24 टक्के लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या