Monday, June 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजबारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यामध्ये २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या दरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी उद्या दिनांक २१ मे २०२४ रोजी जाहीर केला जाणार आहे. उद्या सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

राज्यामध्ये तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. बारावीचा निकाल ९ विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल बघता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या